Delhi Violence : आप नेत्यावर संशयाची सुई; पक्षातून हकालपट्टी 

Delhi violence AAP suspend councillor Tahir Hussain
Delhi violence AAP suspend councillor Tahir Hussain

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीत एका आयबी कॉन्स्टेबलची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात कर्मचाऱ्याच्या अंगावार धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणी आपचे नेते ताहिर हुसेन यांच्याभोवती संशयाची सुई फिरत असून त्यांची आम आदमी पक्षाने हकालपट्टी केली आहे.

दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सीएए विरोधक व समर्थकांक झालेल्या हिंसाचारात तब्बल ३८ जणांचा मृत्यू झाला. यात आयबी कार्यरत असलेल्या अंकित शर्मा यांचाही समावेश आहे. अंकित शर्मा (२६) हे मंगळवारपासून बेपत्ता होते आणि त्यांचा मृतदेह बुधवारी दंगल उसळलेल्या चांद बाग परिसरातील नाल्यामध्ये आढळला. शर्मा यांच्या हत्येत ताहिर हुसेन आणि त्याच्या साथीदारांचा हात असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी आपचे नेते ताहिर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना डबल शिक्षा द्या : केजरीवाल

तत्पूर्वी, दिल्लीतील खाजुरी खास भागात असलेली चार मजली इमारत ताहिर हुसेन यांची आहे. दंगलीच्या काळात या इमारतीचा दगडफेक आणि जाळपोळ करण्यासाठी वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या इमारतीच्या छतावर दगड-विटा, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिड आढळून आले आहे. आयबी कर्मचारी शर्मा यांच्या हत्येतही हुसेन यांचा सहभाग असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आता ताहिर यांना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com