दिल्लीसह उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेशाचा काही भाग, गुजरातचे कच्छ व सौराष्ट्र विभाग व ओडिशा या राज्यांत थंडीची लाट कायम राहणार आहे. 

नवी दिल्ली - दिल्लीसह उत्तर भारत व देशाच्या अनेक भागांत थंडीची तीव्र लाट आली आहे. राजधानी दिल्लीत आज सकाळी व संध्याकाळी दाट धुक्‍याचे साम्राज्य असल्याने काही अंतरावचेही दिसू शकत नव्हते. नागरिकांनी पुढचे तीन दिवस (ता. 27 पर्यंत) आवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडावे व सलगपणे आलेल्या सरकारी सुट्यांना जोडून प्रवासाचे बेत आखत असाल तर तेही रद्द करावेत, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली व उत्तर भारतातील अनेक राज्यांत पारा चार अंशांपर्यंत घसरला आहे. दाट धुक्‍यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या व दिल्लीमार्गे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून इंदिरा गांधी विमानतळावरून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणांवरही गंभीर परिणाम झाला. दिल्लीतील रस्त्यांवर आज सकाळी व रात्री धुक्‍याचा दाट पडदा असल्याने वाहने "रांगू लागल्याचे' दृश्‍य होते. सफदरजंग व पालम भागांतील दृश्‍यमानता 500 मीटर व त्यापेक्षा कमी नोंदविली गेली. येत्या 27 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात थंडीची लाट कायम राहील असाही इशारा "आयएमडी'च्या दिशानिर्देशांत देण्यात आला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, ईशान्य भारत, मध्य प्रदेशाचा काही भाग, गुजरातचे कच्छ व सौराष्ट्र विभाग व ओडिशा या राज्यांत थंडीची लाट कायम राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi weather cold wave in northern India including Delhi