बिहारच्या आखाड्यात ‘चंद्रकांता’ला मागणी

Chandrakanta-Khadi
Chandrakanta-Khadi

भागलपूर (बिहार) - उच्च प्रतीच्या रेशीम व खादीसाठी भागलपूर प्रसिद्ध असले तरी पश्‍चिम बंगालमधील चंद्रकांता खादीला मोठी मागणी असते. यामुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या कापडाचा साठा करून ठेवण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील २०१५ मधील निवडणुकीच चंद्रकांता खादीचा प्रचंड खप झाला होता. खादीचे हे कापड वजनाला हलके असल्याने त्यापासून तयार केलेले धोतर, कुडता, पायजमा, टोप्या, जाकीट, गमछा यांच्या वापरास राजकीय नेते व त्यांचे समर्थकांची पसंती मिळत आहे. चंद्रकांता’ साठी भागलपूर खादी ग्रामद्योगकडे राज्यातील कहलगाव, मुंगेर, खगरिया, पूर्णिया, बेगुसराय आणि बांका आदी ठिकाणाहून मागणी नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक जाकीट या कापडाची असल्याने अशा विविध रंगातील जाकीटचा साठा व्यापारी करीत आहे.

पश्‍चिम बंगालच्या या खादीपासून तयार केलेल्या कपड्यांना वाढती मागणी असल्याचे भागलपूर खादी ग्रामद्योगचे सरचिटणीस बरुन कुमारसिंह यांनी सांगितले. विविध जिल्ह्यात असे कपडे पाठविले जात आहेत. राजकारणातील युवा नेत्यांमध्ये या कपड्यांचे आकर्षण जास्त आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या बिहारच्या निवडणुकीत या कपड्यांची विक्री २०१५च्या निवडणुकांपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली.

‘चंद्रकांता’ची वैशिष्ट्ये

  • भागलपूरच्या रेशीम व खादीपेक्षा वजनाला हलके व मऊ कापड
  • पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहामपूर येथील उत्पादन
  • स्थानिक कापडापेक्षा महाग तरी मागणी जास्त
  • स्थानिक खादीच्या कपडे विक्रीसाठी ५० केंद्रे, तर ‘चंद्रकांता’साठी १२० केंद्रे सुरू

कपड्यांची किंमत

  • ५०० ते १५०० रु. मीटर चंद्रकांता खादी
  • २०० ते ६०० रु. मीटर भागलपूर रेशीम
  • १,१०० ते ३,५०० रु. (प्रत्येकी) चंद्रकांता धोतर
  • ७०० ते ९०० रु. (प्रत्येकी) भागलपूर रेशीम धोतर 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com