esakal | विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी; आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Vijayan

सोने तस्करी प्रकरणी केरळमधील विरोधकांनी आज मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील निलंबीत आयपीएस अधिकारी एम. शिवशंकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना आज ताब्यात घेतले. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी; आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप

sakal_logo
By
पीटीआय

तिरुअनंतपुरम - सोने तस्करी प्रकरणी केरळमधील विरोधकांनी आज मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील निलंबीत आयपीएस अधिकारी एम. शिवशंकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना आज ताब्यात घेतले. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवशंकर यांची पाठराखण न करता मुख्यमंत्री विजयन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी आज केली. सोने तस्करी प्रकरणातील सर्व आरोपींना मुख्यमंत्री कार्यालय पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आज सकाळी केरळ उच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी शिवशंकर यांनी सीमाशुल्क विभागाकडून होणारी अटक टाळण्यासाठी आणि ‘ईडी’ची चौकशी टाळण्यासाठी दोन स्वतंत्र जामीन अर्ज दाखल केले होते.

रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा

हे दोन्ही अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर ‘ईडी’ने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तस्करी प्रकरणाशी मुख्यमंत्री कार्यालयाचाही संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून विजयन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केली होती. शिवशंकर यांच्या चौकशीतून आणखी सत्य बाहेर येईल, असा विश्‍वासही सुरेंद्रन यांनी व्यक्त केला.

Bihar Election 2020 - पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान

Edited By - Prashant Patil