Shraddha Murder Case: लव्ह जिहादवरून राम कदम आक्रमक! श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case: लव्ह जिहादवरून राम कदम आक्रमक! श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी...

Shraddha Murder Case: दिल्लीतील श्रद्धाच्या खळबळजनक हत्येबाबत मंगळवारी मुंबईत निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाचे नेतृत्व भाजप नेते राम कदम यांनी केले. त्यांनी हे प्रकरण 'लव्ह जिहाद' असल्याचे त्यांचे म्हणने आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. घाटकोपरमधील ऑर्चर्ड आर सिटी मॉलच्या मागे हे आंदोलन करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या हत्येचा आरोपी आफताब पूनावाला याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

हेही वाचा- Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

हेही वाचा: Bharat Jodo : मोहन भागवत मशिदीत चालले, काही दिवसांनी मोदी टोपी घालतील; काँग्रेसची खोचक टीका

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी ट्विट करत सांगितले की "हे #लव्हजिहादचे प्रकरण आहे का? वसईतील रहिवासी श्रद्धा हिच्या हत्येचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा आणि आरोपी धर्मांतर करू इच्छित होता? आणि श्रद्धाने नकार दिला? हे कारण होते का? हा लव्ह जिहादचा मामला आहे का? असं ट्विटमध्ये म्हणटं आहे.

दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावालाला मेहरौली जंगलातील त्या ठिकाणी नेले, जिथे त्याने श्रद्धाच्या शरीराच्या काही भागांची कथितपणे विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आफताबने पोलिसांना सांगितले की, 'येस आय किल्ड हर' म्हणजे होय मी त्याला मारले.

आफताबने श्रद्धाचा फोन फेकून दिला आहे असं, दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. तिचे शेवटचे लोकेशन ट्रेस केले जात आहे, जेणेकरून तो परत मिळवता येईल. पोलिसांचे म्हणणे आहे की, श्रद्धाचे इन्स्टाग्राम अकाऊंट वरून समजत आहे की, ती जूनपर्यंत जिवंत होती.