
भारताने अन्य देशांमधील नियमित उड्डाणांवरही बंदी कायम ठेवली आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, यावर भारत सरकारने शिक्कामोर्तब केलं आहे. नागरी उड्डाण महासंचलनालयाने (Director General of Civil Aviation) ने गुरुवारी (ता.२८) सायंकाळी याबाबतची माहिती दिली. नव्या कोरोना स्ट्रेनमुळे यंत्रणांवर येत असलेला ताण आणि युरोपीय देशांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत हे पाऊल उचलण्यात आलं आहे. नियमित उड्डाणांवर बंदी असताना 'वंदे भारत' मिशनअंतर्गत मर्यादित उड्डाणे करण्यात येत आहेत.
- विराट कोहली आणि तमन्नाला केरळ हायकोर्टाची नोटीस; काय आहे प्रकरण?
दुसरीकडे भारताने अन्य देशांमधील नियमित उड्डाणांवरही बंदी कायम ठेवली आहे. असे असताना मात्र देशांतर्गत उड्डाणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीचा आगडोंब उसळण्याआधीच्या तुलनेत देशांतर्गत उड्डाणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय भारतीय विमान कंपन्यांनी घेतला आहे. याअंतर्गत देशांतर्गत उड्डाणांचे प्रमाण ७० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. विमान कंपन्या सध्या ७० टक्के देशांतर्गत विमान वाहतूक करत आहेत.
- कर्नाटकात काँग्रेस एकाकी; भाजपनं विरोधी पक्षाला केलं पार्टनर!
देशांतर्गत विमान वाहतुकीला २५ मे पासून सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी ३० हजार प्रवाशांनी विमानाने प्रवास केला होता. ३० नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, २.५२ लाखाहून अधिक नागरिकांनी विमान प्रवासाचा लाभ घेतला आहे.
— DGCA (@DGCAIndia) January 28, 2021
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)