कर्नाटकात काँग्रेस एकाकी; भाजपनं विरोधी पक्षाला केलं पार्टनर!

Congress_BJP
Congress_BJP

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) मध्ये पुन्हा राजकीय समीकरणे बदलली आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) विरोधी पक्ष जनता दल सेक्युलर (JDS)शी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष एकटा पडला आहे. पण याची किंमत भाजपला मोजावी लागली आहे. विधान परिषदेत फक्त १३ सदस्य असूनही भाजपने जेडीएसला अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जेडीएसचे कुमारस्वामी आणि भाजपचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा हे एकत्र आले आहेत. येडियुरप्पा यांनी कुमारस्वामींचं सरकार पाडलं होतं आणि आता त्यांनीच एकमेकांशी हात मिळवले आहेत. 

येडियुरप्पा सरकारमधील मंत्री एस. ईश्वरप्पा म्हणाले की, काँग्रेस आणि मुस्लीम लीगला दूर ठेवण्यासाठी इतर सर्व पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळेच आम्ही जेडीएसला सोबत घेतले आहे. पण भाजप आणि जेडीएस किती काळ एकत्र संसार थाटतील हे येणार काळच सांगेल. २००६मध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले होते, आणि त्यावेळी येडियुरप्पा यांच्या पाठिंब्याने कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. यावेळी विधानपरिषदेच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. ज्यावरून गेल्या महिन्यात गोंधळ उडाला होता. 

विशेष म्हणजे, ७५ सदस्य संख्या असलेल्या विधान परिषदेत जेडीएसचे फक्त १३ सदस्य आहेत. तर भाजपचे ३१ सदस्य आहेत. आणि असे असूनही अध्यक्षपदासाठी जेडीएसला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यामुळे २९ सदस्यसंख्या असलेला काँग्रेस पक्ष बॅकफूटवर पडला आहे. 'भाजप आम्हाला अध्यक्षपदासाठी मदत करेल आणि आम्ही उपाध्यक्षपदासाठी भाजपला साथ देणार आहोत,' असं जेडीएसचे वरिष्ठ नेते बसवराज होरट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. 

दुसरीकडे, जेडीएसने आपली भूमिका बदलल्याने कॉंग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसचे आमदार कृष्णा बैरे गौडा म्हणाले की, "यापूर्वीप्रमाणे दोन्ही विरोधी पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. जेडीएस फक्त स्वत:ला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) म्हणवून घेतो, पण ते सेक्युलर नाहीत." 

राजकीय तज्ज्ञांच्या मते, जेडीएसशी सूत जुळवत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांनी काँग्रेसला बॅकफूटवर तर पाडलेच. शिवाय बंडखोरीसाठी तयारीत असलेल्या आमदारांना तुमच्यामुळे काही फरक पडणार नाही, असा स्पष्ट संदेशही दिला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com