

dharmendra pradhan latest news
esakal
नीट पेपरफुटीनंतर झालेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, नीट पेपर लीक प्रकरणी झालेल्या आंदोलनावेळी काही लोकांनी जेन झींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला राजाीनामा द्यावा लागला. मंत्रिपद माझ्यासाठी कधी महत्त्वाचं नव्हतं. मीच पंतप्रधान मोदींकडे केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता असंही त्यांनी सांगितलं. धर्मेंद्र प्रधान भुवनेश्वरमधील जीएम विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत होते.