

YouTuber Dhruv Rathee was reportedly detained by Delhi Police at his Gurugram residence ahead of the proposed CJP protest at Jantar Mantar
esakal
दिल्लीतील जंतर-मंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रस्तावित आंदोलनापूर्वी पोलिसांनी व्यापक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी गुरुग्राम येथील निवासस्थानातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. News 18 च्या वृत्तानुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) वतीने आयोजित या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ध्रुव राठी दिल्लीला आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अन्य व्यक्तींनाही ताब्यात घेतले आहे.