Chandrayaan 2 : विक्रम लँडरच्या माहितीकडे इस्रोनं केलं दुर्लक्ष?

Did ISRO ignore information about vikram lander by Shanmug Subramanian
Did ISRO ignore information about vikram lander by Shanmug Subramanian

नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी "चांद्रयान 2' च्या "विक्रम' लॅंडरचा संपर्क तुटल्यानंतर तीन महिन्यांनंतर "विक्रम'चे अवशेष शोधण्यास यश मिळाले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था "नासा'ने ही माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या शोधाचे श्रेय त्यांनी भारतीय अभियंता शण्मुगा सुब्रमण्यनला (वय 33) दिले आहे. त्याने 3 ऑक्टोबरलाच ही माहिती इस्रो व नासाला दिली होती. नासाने तत्परता दाखवत त्याची दखल घेतली.

असा लागला शोध 
शण्मुगा सुब्रमण्यन याला अवकाशशास्त्रात रूची आहे. "नासा'ने "विक्रम' लॅंडरच्या शोधाविषयी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केल्यानंतर त्याने "नासा'ने प्रसिद्ध केलेली दोन छायाचित्रांचे लॅपटॉपवर डाऊनलोड करुन घेतली. त्याने सांगितले की, माझ्या दोन लॅपटॉपवर दोन छायाचित्रांची तुलना केली. एका बाजूला जुने छायाचित्र होते तर दुसऱ्यावर नवे. शोध घेणे अवघड होते, पण मी कसून प्रयत्न केला. 4-5 दिवस साधारण 7-8 तास मी यासाठी काम करीत होतो. या शोधाची माहिती मी 3 ऑक्‍टोबरला ट्विटरवर दिली. मात्र ही माहिती जाहीर करण्यापूर्वी "नासा'ला 100 टक्के पक्की माहिती हवी होती. त्यानुसार "नासा'ने सर्व माहिती पुन्हा तपासली. त्यात तथ्य असल्याचे आढळून आल्यावर "नासा'ने आज ट्‌विट करून "विक्रम' लॅंडरचे अवशेष मिळाल्याचे जाहीर केले. 

"नासा'ची तत्परता 
"विक्रम' लॅंडर जेथे पडला ती जागा शोधल्याचे मी "नासा' आणि "इस्त्रो' या दोन्ही संस्थांना कळविले होते. मात्र केवळ "नासा'कडून याला तातडीने उत्तर आले, असे शण्मुगाने सांगितले."विक्रम' लॅंडरशी संबंधित माहितीचा संपूर्ण तपशील "इस्त्रो'ने मागितला आहे. याबाबतचा संपूर्ण अहवाल "नासा' देणार आहे. 

चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले "विक्रम' लॅंडरचे अवशेषांचे छायाचित्र "नासा'च्या "लुनार रेकनायसेन्स ऑर्बिटर' (एलआरओ) ने टिपली आहेत. "Nasa Moon' या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवरून ही माहिती मंगळवारी जाहीर केली. या छायाचित्रात "विक्रम' लॅंडर चंद्रावर ज्या ठिकाणी कोसळले ती जागा व त्याचे तुकडे जेथे पसरले ती ठिकाणे दिसत आहेत. काही किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे दोन डझन ठिकाणी लॅंडर तुकडे पडले आहेत. "नासा'ने म्हटले आहे की, चंद्राच्या ज्या भागावर लॅंडर कोसळला तेथील छायाचित्र 26 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. "विक्रम' लॅंडरच्या सिग्नलचा शोध घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होतो. शण्मुगा सुब्रमण्यनने प्रथम "एआरओ' मोहिमेशी संपर्क साधत "विक्रम'च्या अवशेषांची ओळख पटविण्यासंबंधी सकारात्मक माहिती त्याने दिली. लॅंडर कोसळल्याच्या मुख्य ठिकाणाच्या वायव्येला 750 मीटरवर लॅंडरचा पहिला तुकडा आढळल्याचे त्याने निदर्शनास आणून दिले. 

शण्मुगा सुब्रमण्यन (वय 33) हा चेन्नईचा रहिवासी असून तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. "विक्रम'चे अवशेष शोधण्याचे श्रेय "नासा'ने शण्मुगला दिले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था "नासा'ची "चांद्रयान 2' मोहीम सफल झाल्याचे त्याने म्हटले आहे. शण्मुगाने "एलआरओ'च्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्र डाऊनलोड केली. त्याचे निरीक्षण करून "विक्रम'च्या अवशेषांच्या ठिकाणाची माहिती "नासा'ला दिली. "नासा' आणि अरिझोना स्टेट युनिर्व्हसिटीने काल याबाबत दुजोरा दिला. 

"चांद्रयान 2' मोहिम यशस्वी झाली आहे. "विक्रम' लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर सहजपणे उतरू न शकल्याचे दुःख आहे. मात्र यामुळे सामान्य नागरिक "इस्त्रो' आणि लॅंडरबाबत जाणून घेऊ लागले आहेत. त्याविषयी चर्चा करीत आहे. ही गोष्ट चांगली आहे. 
शण्मुगा सुब्रमण्यन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com