पेट्रोलपेक्षा डिझेल महाग, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे निमित्त करून केंद्राने आज सलग १८ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले.

नवी दिल्ली, ता. २४ : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावांमध्ये किरकोळ वाढ झाल्याचे निमित्त करून केंद्राने आज सलग १८ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तर डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाल्याचे इतिहासात पहिल्यांदाच दिसून आले आहे. 

दिल्लीत डिझेलचे दर देशाची आर्थिक राजधानी मुंबईपेक्षा आज जास्त झाले आहेत. दिल्लीत आज डिझेल प्रतिलिटर ०.४८ पैसे महाग होऊन ते ७९.८८ रुपये इतके झाले. पेट्रोलची किंमत ७९.७६ रुपये प्रति लीटर झाली आहे. 

आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय कोरोनावर मात अशक्य; संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा इशारा

मागच्या १८ दिवसांच्या दरवाढीत डिझेल १०.४८ रुपये तर पेट्रोल ८.५० रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोलियम पदार्थांचे दर २०१४ पासून नियंत्रणमुक्त करण्यात आले. मोदी सरकारने ते रोजच्या रोज बदलण्याचा प्रघात पाडला. 

रामदेवबाबांनी आणलेलं कोरोनावरील औषध निघालं साध्या सर्दी-खोकल्याचं!

दिल्लीत आज पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७९.७६ रुपये इतके स्थिर होते. मात्र डिझेलचे दर त्यापेक्षा जास्त म्हणजे प्रतिलिटर ७९.८८ इतके झाले. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले, असे मानले जाते. पेट्रोलपेक्षा डिझेल स्वस्त असण्याचे एक ठळक कारण हे असते की पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर राज्य सरकारे कमी कर आकारतात. दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे यावरील कर ६४ टक्के आणि ६३ टक्के इतका म्हणजे जवळपास सारखाच आणल्याने डिझेलचे भाव झपाट्याने वाढत आहेत.

सलून आणि पार्लर कधी सुरू होणार? वडेट्टीवार यांनी दिली माहिती

राष्ट्रीय राजधानी म्हणून दिल्लीला पेट्रोलियम पदार्थांसह इतर अनेक प्रकारच्या करांमधून विशिष्ट सवलत मिळते. मात्र दिल्ली सरकारने कोरोना संसर्गाच्या आणि सलगपणे वाढवलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यापासून डिझेलवर लावण्यात येणारा कर १६.७५ टक्क्यांवरून थेट ३० टक्क्यांवर नेला. परिणामतः डिझेलची दरवाढ झपाट्याने झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diesel rates high than petrol in delhi first time in india