उपराष्ट्रपती निवडणुकीचे वेगळेपण व वैशिष्ट्ये

उपराष्ट्रपती नवीन नावही या पदासाठी पुढे येऊ शकते
Vice Presidential election
Vice Presidential election

नवी दिल्ली - उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक यंदा संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना म्हणजे ६ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार असून भाजपच्यावतीने या पदासाठी मुस्लिम चेहऱयाला प्राधान्य दिले जाईल, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केरळचे राज्यपाल अरीफ महंमद खान आदी अनेक नावांची चर्चा असली तरी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या धक्कातंत्राचा अविष्कार पुन्हा झाला तर एखादे नवीन नावही या पदासाठी पुढे येऊ शकते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचेही अध्यक्ष असतात. साहजिकच या पदासाठी पंतप्रदान अत्यंत काळजीपूर्वक निवड करणार हे निश्चित आहे.

सध्याचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा कार्यकाल ११ आॅगस्ट रोजी संपत आहे. १० आॅगस्ट हा त्यांच्या उपराष्ट्रपतीपदाचा अखेरचा दिवस असेल. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोन्ही निवडणुकांमध्ये एक मोठा फरक आहे. यासाठीचे निर्वाचक मंडळ म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज हेच वेगळे असते. उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करण्याचा अधिकार फक्त सुमारे ७९० संसद सदस्यांना असतो. प्रत्येक खासदार एक मत देऊ शकतो.

राष्ट्रपतीपद निवडणुकीत मतदान करणाऱया आमदारांना उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा हक्क घटनेने दिलेला नाही. राष्ट्रपतीनियुक्त खासदारांना राष्ट्रपतीपदासाठी मतदान करता येत नाही. मात्र उपराष्ट्रपतीपदासाठी ते मतदान करू शकतात. म्हणजेच सध्याच्या स्थितीनुसार राज्यसभेचे २३३, नियुक्त १२ आणि लोकसभेचे ५४३ खासदार यंदा उपराष्ट्रपतींची निवड करतील.

उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार कोण असावेत याचेही काही निश्चित निय व अटी आहेत, त्या अशा

१) संबंधित उमेदवार भारताचे नागरिक व मतदारही असावेत.

२) त्यांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असावे.

३) केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कोणतेही लाभाचे पद भूषविणारी व्यक्ती उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी करू शकत नाही.

४) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार देशातील कोणतेही विधीमंडळ किंवा संसद यांचे सदस्य नसावेत. तसे ते असतील तर त्यांना निवड झाल्यावर खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. (नायडू यातील पहिल्या अटीत बसत नव्हते. मात्र नक्वी त्यातही फिट्ट बसतात.

दरम्यान उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरताना किमान २० खासदार प्रस्तावक व तेवढेच खासदार समर्थक म्हणून असणे आवश्यक असते. यासाठीही १५ हजार रूपयांची अनामत रक्कम उमेदवारी अर्जाबरोबर जमा करावी लागते. ही निवडणूक मतपत्रिका वापरून ‘सिंगल ट्रान्स्फरेबल व्होट सिस्टीम' द्वारे होते. यात प्रत्येक मतदाराला प्राधान्यक्रमाने पसंतीचे मत द्यावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com