Delhi Noida News : नोएडाला पुराचा धोका

‘हिंडन’च्या पाणीपातळी वाढ; २०० जणांचे स्थलांतर
 hindon  river
hindon riverEsakal

Noida News : हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने नोएडाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. गौतम बुद्ध नगर प्रशासनाकडून हिंडन नदीकाठच्या सखल भागाला पुराचा इशारा देण्यात आला आहे. या नदीकाठच्या पाच गावांतील जवळपास २०० जणांना निवारागृहांत हलविण्यात आले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

सध्यातरी हिंडन नदी दिल्ली आणि प.उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या नोएडातून धोक्याच्या २०५ मीटरच्या पातळीखालून वाहत आहे. सध्या नदीची पातळी २०० फूट आहे. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अतुलकुमार यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले, की संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन पाच गावांतील २०० जणांना प्रशासनाने उभारलेल्या निवारागृहांत हलविण्यात आले आहे.

 hindon  river
Desh : सचिन पायलटांनी मुख्यमंत्री गहलोत यांना अल्टीमेटम दिलेल्या 3 मागण्या कोणत्या ? आज आहे शेवटचा दिवस

या ठिकाणी त्यांना निवाऱ्यासह, अन्न आणि आरोग्यसुविधा पुरविण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. अतुलकुमार गौतम बु्द्धनगरच्या पुराच्या मदत कार्यासाठी नोडल अधिकारी म्हणूनही काम करत आहेत. नोएडा हा जिल्हा हिंडन व यमुना नद्यांच्यामध्ये असून यमुना नदीच्या पुराचा नुकताच जिल्ह्याला फटका बसला होता. या पुरामुळे सखल भागातील ५५० हेक्टर जमिनीचे नुकसान होण्यासह हजारो नागरिक, जनावरेही प्रभावित झाले होते.

 hindon  river
Desh : राहुल गांधींना नवा पासपोर्ट; आज अमेरिकेला जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com