Desh : सचिन पायलटांनी मुख्यमंत्री गहलोत यांना अल्टीमेटम दिलेल्या 3 मागण्या कोणत्या ? आज आहे शेवटचा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन पायलट

Desh : सचिन पायलटांनी मुख्यमंत्री गहलोत यांना अल्टीमेटम दिलेल्या 3 मागण्या कोणत्या ? आज आहे शेवटचा दिवस

सचिन पायलट बुधवारी राजस्थान विधानसभा मतदारसंघात पोहोचले, "तेव्हा त्यांनी गेहलोत सरकारकडे तीन मागण्या केल्या होत्या त्याची आठवण करून देत, 31 मे हा शेवटचा दिवस आहे. उद्या पाहू काय होतं" असे ते पत्रकारांना म्हणाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अनेक दिवसापासून वाद सुरू आहे काही दिवसांपूर्वी वसुंधरा राजे सरकारमधील कथित भ्रष्टाचारात प्रकरणांमध्ये कारवाईच्या मागणीसाठी पायलेट यांनी एक दिवसीय उपोषण केले होते आणि भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी पाच दिवसांची पदयात्रा ही केली होती. त्यावेळी त्यांनी गेहलोत सरकारकडे तीन मागण्या मांडल्या होत्या आणि पंधरा दिवसात त्या पूर्ण करण्याचे अल्टिमेटम गेहलोत सरकारला दिले होते.

या होत्या सचिन पायलटच्या तीन मागण्या

-वसुंधरा राजे सरकारवर झालेला भ्रष्टाचाराचा आरोपांची चौकशी करणे

-पेपर फुटीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या विद्याथ्यांना योग्य ती भरपाई द्यावी.

-सरकारी नोकरी मधील भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, आरपीएमसी विसर्जित करून त्यांची पुनर्रचना करावी.

काँग्रेस हायकमांड राजस्थानमध्ये सामंजस्याचा दावा करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी अशोक गेहलोत व सचिन पायलट्यांची भेट घेतली या बैठकीनंतर दोन्ही नेते एकत्र काम करण्यास तयार असल्याचे दावा पक्षाने केला होता, मात्र दोन दिवसानंतर टोंकला पोहोचलेल्या पायलटनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत दिले.

तरुणांच्या मुद्द्यावर तडजोड नाही.. पायलट

पेपरफुटीनंतर सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा रद्द केल्याचा संदर्भ देत पायलट म्हणाले, “जो पर्यंत तरुणांना न्याय मिळण्याचा प्रश्न आहे, तो पर्यंत मला वाटते कोणत्याही प्रकारची तडजोड होण्याची शक्यता नाही." ते सरकारकडून कारवाईची वाट पाहत आहेत. सचिन पायलट म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी दिल्लीत चर्चा झाली होती. त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे हायकमांडने म्हटले आहे. तर, उद्या काय होते ते पाहू".

राजस्थानमधील वाद मिटत नाही.

राजस्थानमधील नेतृत्वावरून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. मात्र, सोमवारी राजस्थान काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. बैठकीत दोन्ही नेत्यांनी राजस्थानमध्ये एकत्र काम करावे आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे रिंगणात उतरावे, अशी सूचना हायकमांडने केली होती.

राजकीय वर्चस्वासाठी 2018 च्या निवडणुकीपासून सुरू आहेत वादविवाद-

• राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील राजकीय वर्चस्वाचे हे युद्ध 2018 च्या निवडणुकीपासून सुरू आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेव्हा सचिन पायलट प्रदेशाध्यक्ष होते. या निवडणुकीत काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. अशा स्थितीत अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही मुख्यमंत्रीपदावर ठाम होते.

पायलट काँग्रेस अध्यक्ष होण्याऐवजी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दावा करत होते, आणि पाच वर्षे भाजपच्या विरोधात लढत होते. तर अशोक गेहलोत ज्येष्ठतेच्या आधारावर आणि त्यांच्या बाजूने अधिक आमदारांचे समर्थन करत होते. पक्षाच्या हायकमांडने गेहलो यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचा दावा पायलटच्या समर्थकांनी केला आहे.