Assam News : ''...तर तीन दिवसांमध्ये गुवाहाटीचं कब्रस्तान करु'', थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला इशारा

assam news
assam newsesakal

गुवाहाटीः एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल आणि आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देताना ब्रदुद्दीन अजमल यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं होतं की, मला मियाँ मुस्लिमांकडून मतांची अपेक्षा नाही. आसाममधील मूळ मुस्लिमांच्या विकासावर आमचं लक्ष असून मला इतर मुस्लिमांकडून कधीच मतांची अपेक्षा नाही. मात्र मूळ मुस्लिमांकडून मला मतांची अपेक्षा आहे. महाविद्यालयांमध्ये मुयाँ मुस्लिमांची संख्या आपल्या मूळ तरुणांपेक्षा जास्त असून हे खेदजनक असल्याचं ते म्हणाले होते.

assam news
धक्कादायक! मॅनेजर पदावरील भारतीय महिलांच्या संख्येत घसरण; पुरुषांच्या तुलनेत पगारही झाले कमी

त्यानंतर एआययूडीएफ अर्थात ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, जर आम्ही तीन दिवस काम केलं नाही तर संपूर्ण गुवाहाटीचं कब्रस्तान होईल. सर्व मियाँ मुस्लिम राजधानी गुवाहाटीमध्ये काम करतात. त्यांच्याशिवाय शहर बकाल होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

assam news
Helicopter Crash : नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना

दोन्ही नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर बद्रुद्दीन अजमल आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या कब्रस्तानच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com