'TRP च्या मागे लागलेल्यांनी मला दोषी ठरवलं, कोर्टाने नाही'; दिशा रवीने मांडली भुमिका

disha ravi
disha ravi

बेंगलुरु : पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीने एक वक्तव्य जाहीर करत आपली भुमिका मांडली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तिने हे चारपानी वक्तव्य सार्वजनिक केलं आहे. तिने आपला सविस्तर अनुभव आणि भुमिका देखील मांडली आहे. या वक्तव्यात तिने भारतीय माध्यमांवर टीका केली आहे. तिने म्हटलंय की, कोर्टाने नव्हे तर टीआरपीच्या मागे लागलेल्या न्यूज चॅनेल्सनी तिला दोषी ठरवलं आहे. 

काय म्हणाली दिशा?
दिशा रवीने म्हटलंय की, शेतकरी असणाऱ्या तिच्या आजी-आजोबांमुळेच तिला पर्यावरणासाठी चळवळ करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तसेच आपण पर्यावरण कार्यकर्ती का बनलो आणि शेतकऱ्यांना पाठिंबा का दिला, याबाबत तिने स्पष्टीकरण दिलं आहे. तिने आपल्या वक्तव्यात म्हटलंय की, पर्यावरणाच्या बाबतीत विचार करणं केंव्हापासून गुन्हा झाला आहे? तिच्या स्वायत्ततेचं उल्लंघन करण्यात आलं आहे. तसेच कोर्टाने नव्हे तर टीआरपीच्या मागे लागलेल्या न्यूज चॅनेल्सनी तिला दोषी ठरवलं आहे. 

तिने तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या लोकांचे आभार मानले आहेत, ज्यांनी स्वत: तिचा खटला लढण्यासाठी पुढाकार घेतला. दिशा रवीने म्हटलंय की, तिच्यासाठी गेले काही दिवस खूपच वेदनादायी होते. मात्र, त्यांचं काय जे अजूनही तुरुंगात आहेत आणि ज्यांना मदत मिळाली नाहीये. पुढे न्यूज चॅनेल्सला उद्देशून तिने म्हटलंय की, त्या गरीबांचं काय ज्यांची कहानी विकली जाणार नाहीये आणि आपल्या स्क्रीनसाठी लायकीची नाहीये? तिने बस्तरचे एक कार्यकर्ता सोनी सोरी यांचा उल्लेख केला ज्यांना रोज धमकी मिळत आहेत. पुढे तिने म्हटलंय की, आमची लढाई सुरुच राहिल. 

13 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी दिशाला बेंगुलुरुमधून अटक केली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने जाहीर केलेल्या टूलकिट संदर्भात तिचा संबंध असल्याच्या आरोपावरुन तिला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर तिला 10 दिवसांनंतर दिल्ली कोर्टाकडून जामीन देण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com