डाळींच्या मागणीवरुन पश्‍चिम बंगाल व केंद्रात वाद 

masoor-and-moong-dal
masoor-and-moong-dal
Updated on

कोलकता - लॉकडाउनच्या काळात केंद्र सरकार आणि पश्‍चिम बंगालमध्ये विविध कारणांवरून वाद झडत आहेत. आधी पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून रेशन दुकानांतून तांदळाच्या दर्जावरुन तर आता मसूर आणि मूग डाळीच्या मागणीवरुन संघर्षाला तोंड फुटले आहे. 

पश्‍चिम बंगाल सरकारच्या मागणीनुसार मूग व मसूर डाळीचा पुरवठा केला जाऊ शकत नाही,’ असे ‘नाफेड’ने कळविले आहे. राज्याला लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, सध्या बहुतेक डाळ गिरण्या बंद आहेत किंवा कमी कामगारांमध्ये काम सुरू आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालला मूग किंवा मसूर डाळीचा पुरवठा केला जाऊ शकत नाही. त्याऐवजी तूर डाळ किंवा काबुली चणा पाठविण्याची तयारी ‘नाफेड’ने दाखविली आहे. मात्र या दोन्ही डाळी बंगाली लोकांना फारशा आवडत नाहीत, असे पश्‍चिम बंगालने कळविले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘ केंद्राने सुरुवातीपासूनच पश्‍चिम बंगालबाबत दुजाभाव केला आहे. आधी रेशनवरील धान्य पुरेशा प्रमाणात पाठविले नाही. त्यानंतर शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात गोंधळाचे वातावरण निर्माण केले. 
ज्योतिप्रिया मलिक, अन्नधान्य वितरण मंत्री, पश्‍चिम बंगाल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com