Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Divya Mittal Politics : दिव्या मित्तल यांनी 'एक्स'वर व्हिडिओ शेअर करत आपल्या राजीनाम्याबाबत आणि भविष्यातील वाटचालीबाबत स्पष्टीकरण दिले. कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नसले, तरी भाजपविषयी टीकात्मक भूमिका दिसून आली.
Divya Mittal

Divya Mittal Announces Entry Into Politics After IAS Resignation

esakal

Updated on: 

Why Did Divya Mittal Resign From IAS Service? : उत्तर प्रदेशातील आयएएस सेवेचा अचानक राजीनामा देऊन खळबळ उडवून देणाऱ्या कार्यक्षम अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पुढील वाटचालीची घोषणा केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातच राहून राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी सकाळी, आधीच जाहीर केलेल्या नियोजनानुसार, दिव्या यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करून अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे स्पष्ट केले नाही, तरीही त्या भाजपबाबत टीकात्मक भूमिकेत दिसल्या. तसेच, आपण कोणालाही घाबरणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आयएएसचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com