

Possible DMK AIADMK tie up may change power game in Tamil Nadu
Esakal
DMK AIADMK Talks Trigger Political Storm तामिळनाडुत अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं धमाकेदार यश मिळवत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. विजयकडून काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला गेला असला तरी राज्यपालांकडून बहुमताचा आकडा घेऊन या असं सांगण्यात आलंय. आता यातच तामिळनाडुच्या राजकारणात भूकंप येईल अशा चर्चा रंगल्या आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात आघाडीच्या चर्चा होत आहे.