esakal | 'मोदीजी AC कारमधून बाहेर निघा'; महाग पेट्रोल-डिझेलविरोधात रॉबर्ट वाड्रांची सायकल राईड
sakal

बोलून बातमी शोधा

robert wadra

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सोमवारी सकाळी दिल्लीत सायकल चालवत असल्याचं दिसून आले

'मोदीजी AC कारमधून बाहेर निघा'; महाग पेट्रोल-डिझेलविरोधात रॉबर्ट वाड्रांची सायकल राईड

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सोमवारी सकाळी दिल्लीत सायकल चालवत असल्याचं दिसून आले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. याचा विरोध म्हणून रॉबर्ट वाड्रा यांनी खान मार्केट ते आपल्या ऑफीसपर्यंत सायकल चालवली. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एसी कारच्या बाहेर यायला हवं, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

रॉबर्ट वाड्रा म्हणाले की,  पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एसी कारच्या बाहेर येऊन पाहायला हवं. लोकांना किती अडचणी सहन कराव्या लागत आहेत, हे त्यांना समजून येईल. मोदी कोणत्याही गोष्टीसाठी जुन्या सरकारवर खापर फोडतात आणि पुढे जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने विरोधक आक्रमक झाले आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे काँग्रेससह अन्य विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी अभूतपूर्व असा उच्चांक गाठला आहे. पेट्रोलचे दर 95 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत, तर डिझेल 90 रुपयांच्या आसपासच्या दराने विकला जात आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. असे असले तरी मोदी सरकारने तुर्तास कोणत्याही दिलाशाची तयारी दाखवलेली नाही.

चीनची राजकीय खेळी, स्वतःच्या नागरिकांपेक्षा जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी खटपट

दरम्यान, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलच्या किंमती कमी झाल्या होत्या. याचा लाभ घेण्यासाठी मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले होते. या काळात सरकारला चांगला फायदा झाला. पण, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. दुसरीकडे सरकारकडून उत्पादन शुल्क कमी करण्याची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत आहेत.