
Alert : या चुका करत असाल तर अपघात होणारच! वाचा काय आहे सिट बेल्टचं एअरबॅगशी कनेक्शन
नुकतंच आपण टाटा संसचे पूर्व चेअरमॅन सायरस मिस्त्रीच्या अपघाताबाबत ऐकलंत. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे बिजनेस इंडस्ट्रीबरोबरच अनेकांना धक्का बसला आहे. भारतात दरवर्षी १० पैकी ७ अपघाती मृत्यूमध्ये चालक आणि बसलेल्यांनी सीटबेल्ट लावलेला नसतो. ७० टक्के मागच्या सीटवर बसणारे लोक सीट बेल्ट लावत नसल्याचे एका सर्वेमध्ये दिसून आले आहे. (Connection of seat belt and air bag)
सायरस मिस्त्री यांनीही सीट बेल्ट लावला नव्हता
रविवारी टाटा संसचे पूर्व चेअरमॅन सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या तपासात त्यांनी सीट बेल्ट लावले नसल्याचे समजले. तसेच पुढे बसलेल्या चालकासह दोन्ही व्यक्तींनी सीट बेल्ट लावले होते. त्यांचा यावेळी जीव जाता जाता वाचला. तर मिस्त्रींसोबत मागे बसलेल्या जहांगीर पंडोल यांचाही मृत्यू झाला. सायरस आणि जहांगीर या दोघांनीही सीट बेल्ट लावला नव्हता.
सीट बेल्ट हे बेसिक सेफ्टी फिचर आहे
अनेक देशांमध्ये ड्रायव्हरसह सगळ्या प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य केला जातो. यासाठी कायदा करण्यात आलाय. एयरबॅगचं डिझाईन प्रवाशाच्या सेफ्टीच्या हिशोबाने तयार करण्यात आलंय. अर्थात एअरबॅग सीट बेल्ट लावणाऱ्यांचीच सुरक्षा करतो.
सीटबेल्ट लावणे आवश्यक का?
सीटबेल्ट आणि एअरबॅग एकावेळी काम करतं. भारतातील जवळपास सगळ्याच कारला ट्विन एअरबॅग आणि सगळ्या सीटवर सीटबेल्ट असतातच. सीटबेल्ट आणि एअरबॅग अपघाताच्या वेळी सोबत काम करतात. सीटबेल्ट न लावल्यास एअरबॅग काम करत नाही. कारमध्ये जिथेही एअरबॅग असतात तिथे SRS लिहिलेलं असतं. याचा अर्थ असतो Supplementary Restraining System.अर्थात एअर बॅगच तुमचा जीव वाचवू शकते.
कसं काम करतं सीटबेल्ट आणि एअरबॅग
एअरबॅग अनेक सेंसरने कंट्रोल होत असते. जसं इम्पॅक्ट सेंसर, प्रेशर सेंसर, ब्रेक प्रेशर सेंसर. एअर बॅग अॅक्सिडेंटदरम्यान तुमची छाती,चेहरा आणि डोक्याचं रक्षण करतो. सीट बेल्ट जोरदार झटक्यानंतर तुमच्या शरीरास स्थिर ठेवण्यास मदत करतं.