आमदारांनी केली अवघडलेल्या महिलेची प्रसुती!

वृत्तसंस्था
Thursday, 13 August 2020

एका महिलेला प्रसवकळा असह्य झाल्या होत्या. प्रकृती नाजूक चालली होती. याबाबतची माहिती आमदारांना मिळाली आणि त्यांनी स्वतः प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. बाळ आणि आई सुखरूप आहे.

मिझोराम: एका महिलेला प्रसवकळा असह्य झाल्या होत्या. प्रकृती नाजूक चालली होती. याबाबतची माहिती आमदारांना मिळाली आणि त्यांनी स्वतः प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. बाळ आणि आई सुखरूप आहे. झेडआर थाईमसांगा असे आमदाराचे नाव असून, व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. शिवाय, गायनोक्लॉजीचे तज्ज्ञ आहेत.

जेसीबी चालकाचे होतेय कौतुक; व्हिडिओ पाहाच...

मिझोराममधील आमदार थाईमसांगा हे चम्पाई या भागात भूकंपानंतरचा दौरा करण्यासाठी गेले होते. दौऱयादरम्यान एका गर्भवती महिलेला प्रसूती करण्यासाठी तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. यावेळी जिल्हा रुग्णालयात एकही डॉक्टर नसल्याचे आमदारांना सांगण्यात आले. महिला अत्यंत छोट्या गावात राहते. प्रसवकळा सुरू झाल्याने तिला त्रास असह्य होत होता. तिच्या प्रकृती नाजूक होत चालली होती. शिवाय, रक्तस्त्रावही सुरू झाला होता आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण खालावले होते. थाईमसांगा यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: महिलेची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, बाळ आणि आईची प्रकृती चांगली आहे.

दरम्यान, आमदारांनी प्रसुती केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिलेची प्रसुती करत एका आमदाराने आदर्शवत उदाहरण पुढे ठेवले आहे.

खतरनाक विमान लँडींगचे व्हिडिओ व्हायरल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor mla gave birth to a difficult woman at mizoram