...म्हणून डॉक्टर रुग्णालयासमोरच विकतोय चहा

वृत्तसंस्था
Monday, 18 May 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, डॉक्टर अहोरात्र रुग्णांची सेवा करताना दिसतात. पण, येथील एका डॉक्टरने पगार मागितला म्हणून त्याला कामावरून काढून टाकले. डॉक्टरने न्याय मिळण्यासाठी रुग्णालयासमोरच चहा विक्री सुरू केली आहे.

करनाल (हरियाणा): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, डॉक्टर अहोरात्र रुग्णांची सेवा करताना दिसतात. पण, येथील एका डॉक्टरने पगार मागितला म्हणून त्याला कामावरून काढून टाकले. डॉक्टरने न्याय मिळण्यासाठी रुग्णालयासमोरच चहा विक्री सुरू केली आहे.

जीवाच्या आकांताने किंचाळी फोडली पण...

देशात लॉकडाऊनमध्ये पोलिस, आरोग्य, सफाई कर्मचारी हे कोरोनो वॉरीअर्स बनून रक्षण करत आहेत. अहोरात्र काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड ताण येत आहे. कोरोनामुळे डॉक्टरांनाही जीव गमवावा लागल्याच्या घटना जगभरात घडल्या आहेत. पण, करनाल येथील गौरव वर्मा या डॉक्टरने पगार मागितला म्हणून कामावरुन काढून टाकले. त्यानंतर डॉक्टरने आपल्या पत्नीसोबत चहा विक्री सुरू केली आहे.

डॉक्टर गौरव वर्मा यांनी सांगितले की, 'मी, एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. रुग्णालयाने दोन महिन्याचा पगार दिला नाही. पगार मागायला गेल्यावर माझी बदली करण्यात आली. बदलीला विरोध केल्याने मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. या रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी हरियाणा मुख्यमंत्री कार्यालयाकडे यांच्याकडे केली. पण तिथूनही न्याय न मिळाल्याने रुग्णालयाच्या समोर चहा विक्री करत आहे.'

...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल

रुग्णालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले की, लॉकडाऊनमुळे पगार द्यायला अडचण येत आहे. पण डॉ. गौरव यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांना अनेकदा बेकायदेशीर कृत्य केली असून, त्यांना तीन-चार नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत. पण ते भेटायला आले नाहीत. जर त्यांना काही अडचण असेल तर हे प्रकरण भेटून सोडवता येईल.'

लॉकडाऊनमध्ये पगारात कपात नव्हे तर पगारवाढ...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor selling tea with wife in front of hospital due to fired job at haryana