
देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण घरातच होते. अचानक घराला आग लागली, जीवाच्या आकांताने सहा जणांनी किंचाळी फोडली. पण, यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण घरातच होते. अचानक घराला आग लागली, जीवाच्या आकांताने सहा जणांनी किंचाळी फोडली. पण, यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. इंदरगंज येथे संपूर्ण कुटुंबाचा आगीमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
...म्हणून चोरली सायकल; माफीनामा व्हायरल
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंदरगंज येथे एक पेंट शॉपचे दुकान आहे. दुकानाच्या वरील भागात कुटुंब राहा होते. लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात होते. घराला अचानक आग लागली. आगीची तिव्रता पाहून शेजारील नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग आटोक्यात आणली. पण, तोपर्यंत घरामधील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरातून सहा मृतदेह बाहेर काढले. आगीचे कारण समजू शकेलेले नाही.
लॉकडाऊनमध्ये पगारात कपात नव्हे तर पगारवाढ...
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पण, आग आटोक्यात आणल्यानंतर सहा जणांचे मृतदेह पाहून अनेकांनी टाहो फोडला. पोलिसांनी सहा मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.