धक्कादायक!तरुणाच्या पोटातून बाहेर काढली तब्बल 63 नाणी, वाचा प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! तरुणाच्या पोटातून बाहेर काढली तब्बल 63 नाणी, वाचा प्रकरण

धक्कादायक! तरुणाच्या पोटातून बाहेर काढली तब्बल 63 नाणी, वाचा प्रकरण

सोशल मीडियावर अनेक प्रकरण व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही धक्कादायक तर काही थक्क करणारे. सध्या असंच एक मन सुन्न करणारं प्रकरण समोर आलंय. राजस्थानच्या जोधपूर येथील एका व्यक्तीच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल 63 नाणी (Coin) बाहेर काढली आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजतयं. (63 Coins Removed From 36 Year Old Man’s Stomach in Jodhpur Rajasthan goes viral)

हेही वाचा: Social Mediaवर अपमानास्पद टिप्पणी केली तरीही SC/ST कायद्यांतर्गत कारवाई - Kerla HC

जोधपूरच्या या व्यक्तीने नैराश्यात असताना तब्बल 63 नाणी गिळली त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला आणि थेट तो रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यावर रुग्णाच्या पोटात नाण्यांचा मोठा ढीग होता. हे पाहून डॉक्टरांना मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी वेळ न घालवता एंडोस्कोपिक प्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रिया करून तरुणाच्या पोटातून ती सर्व नाणी काढली.

हेही वाचा: Video Viral: 'भावा माफ कर!' विल स्मिथनं ख्रिसची मागितली माफी..

यासंदर्भात अधिक माहिती काढताच या तरुणाने नैराश्यामध्ये असताना दोन दिवसांमध्ये 1 रुपयाची तब्बल 63 नाणी गिळल्याचे दिसून आले. यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की नैराश्यात असताना या तरुणाला वस्तू गिळण्याची सवय आहे. तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याचा मानसिक उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

Web Title: Doctors Removed 63 Coins From Young Mans Stomach In Jodhpur Rajasthan Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top