Video Viral: 'भावा माफ कर!' विल स्मिथनं ख्रिसची मागितली माफी..

विल स्मिथला कोण ओळखत नाही. तो अभिनेता म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो त्याच्या तापट स्वभावामुळेही चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.
Will Smith News
Will Smith News esakal

Will Smith News: विल स्मिथला कोण ओळखत नाही. तो अभिनेता म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो त्याच्या तापट स्वभावामुळेही चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. यंदाच्या वर्षीच्या ऑस्करसोहळ्यात विलनं काय केलं हे साऱ्या जगानं पाहिलं. विल कमालीचा संतापला होता. ऑस्कर सोहळ्याचे होस्टिंग करणाऱ्या (Oscar News) ख्रिस रॉकनं गंमतीत विलच्या बायकोची टिंगल केली. ती विलच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्याचे कारण ख्रिसनं विलच्या पत्नीला जेंडा पिंकेटला तिच्या शाररिक व्यंगावरुन टिप्पणी केली होती. त्यामुळे विलच्या रागाचा पारा चढला. त्यानं थेट ख्रिसच्या कानफटात लगावली होती.

विलच्या तापटपणानं त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. त्यानंतर ऑस्कर समितानं त्याच्यावर ऑस्कर सोहळ्यासाठी बंदी घातली आहे. विलनं (Social Media viral news) याप्रकरणानंतर वेगवेगळ्या माध्यमातून माफी मागितली. पण त्याच्यावर टीका होतच राहिली. यात हॉलीवूडमधल्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यांनी विलचं चुकल्याचे सांगितले. तर काहींनी विलनं जे केलं ते बरोबरच होतं. असंही म्हटलं आहे. यासगळ्यात विलची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून ख्रिसची माफी मागितली आहे.

युट्युबवर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्याच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये विल म्हणतो, ख्रिस, मला माफ कर... मी पुन्हा एकदा तुला सांगेल की...मला माफ कर....याशिवाय त्यानं ख्रिसच्या आईची आणि भावाची देखील माफी मागितली आहे. माझे वागणे हे बरे नव्हते. मलाच ते नवल वाटले. माझी तुझ्याशी बोलण्याची तयारी आहे. मी आता ख्रिसच्या आईची देखील माफी मागितली आहे. मी ख्रिसच्या आईची मुलाखत पाहिली होती. त्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केले ते पाहून मला वाईट वाटले होते. त्यावेळी माझ्या कृत्यामुळे खूप लोकं दुखावली गेली होती.

Will Smith News
Oscar 2022: विल स्मिथ 10 वर्षांसाठी 'बॅन'; काय म्हणालाय अभिनेता?

पाच मिनिटांच्या त्या व्हिडिओमध्ये विलनं आपल्याला त्या कृत्याचा पश्चाताप झाल्याचे म्हटले आहे. त्यावेळी माझा ताबा सुटला आणि माझ्या हातून ते कृत्य झाले. त्याबद्दल मला खेद आहे. मार्चमध्ये झालेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये विलनं ख्रिसच्या कानशीलात ठेवून दिली होती. त्यामुळे जगभरातून विलवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. सेलिब्रेटींच्या गंमती जमती या ऑस्कर सोहळ्याचा भागच असतात. मात्र विलनं ऑस्कर सोहळ्याला गालबोट लावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

Will Smith News
Oscars 2022 : कानशिलात लगावणं विल स्मिथच्या अंगाशी, नेटफ्लिक्सनेही घेतला मोठा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com