esakal | 'शबरीमला'च्या दानपेटीत 'इतक्या' कोटींचे दान; महसुलात दुपटीने वाढ!
sakal

बोलून बातमी शोधा

Sabarimala-Temple

दररोज सुमारे 40 हजार भाविकांना भोजन दान करण्यात येते. पिण्याची पाण्याची चांगली सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे.

'शबरीमला'च्या दानपेटीत 'इतक्या' कोटींचे दान; महसुलात दुपटीने वाढ!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

शबरीमला : शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी, शनिवारी (ता. 16) दानपेटीत तीन कोटी तीस लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पहिल्या दिवशी शबरीमलातील मंदिरात 70 हजारांहून अधिक भाविकांनी भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतल्याचे सांगण्यात आले. 

शबरीमलातील मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्थान बोर्डाचे अध्यक्ष एन. वासू यांनी सांगितले की, मंडल मकरविलाक्कू पूजेसाठी शनिवार (ता. 16) पासून पुढील दोन महिने मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले राहणार आहेत.

- 'जेएनयू'च्या विद्यार्थ्यांचा संसदेवर मोर्चा; पोलिसांनी विद्यार्थ्यांना बाहेरच रोखले

पहिल्याच दिवशी 70 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरातील दानपेटीत पहिल्या दिवशी तीन कोटी 30 लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मंदिराच्या महसुलात 50 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी पहिल्या दिवशी दानपेटीत 1.28 कोटी रुपये जमा झाले होते. 

यंदा पुरविण्यात आलेल्या सोई-सुविधांबद्दलही भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे, असे वासू यांनी सांगितले. 
दररोज सुमारे 40 हजार भाविकांना भोजन दान करण्यात येते. पिण्याची पाण्याची चांगली सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली असून, शबरीमलाला प्लॅस्टिकमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे, अशी माहिती वासू यांनी दिली. 

- आपलं ठरलयं ! दर नाही तर ऊस पण नाही; सांगलीत पेटले आंदोलन

निदर्शनांमुळे मागील वर्षी फटका 

शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटाच्या महिलांना मुक्त प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर मागील वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने झाली होती. त्याचा परिणाम भाविकांच्या संख्येवरही झाल्याचे दिसून आले होते. मागील वर्षी भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. या वर्षी मात्र विनाअडथळा दर्शन घेता आल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले.

- पवार-सोनिया बैठकीनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम; पवार काय म्हणाले?