esakal | Article 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम!
sakal

बोलून बातमी शोधा

turkey-pakistan

जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. जो कधीच वेगळा होऊ शकत नाही.

Article 370 : 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक त्यामुळे...'; भारताचा तुर्कीला सज्जड दम!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संसदेत काश्मीरवर भाष्य करणाऱ्या तुर्कस्तानच्या अध्यक्षांना भारताच्या अंतर्गत विषयांपासून दूर राहा, असे म्हणत तुर्कस्तानचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एर्दोगान यांनी शुक्रवारी (ता.14) पाकिस्तानच्या संसदेत बोलताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. या वेळी त्यांनी काश्मीरच्या विषयावर पाकिस्तानच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करणार असल्याचे जाहीर केले होते. यावर भारताने एर्दोगान यांच्या वक्तव्यावर टीका करीत भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप न करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर तुर्कस्तानला पाकिस्तानच्या दहशतवादावर लक्ष देण्याचा सल्लाही भारताने दिला आहे. 

- Coronavirus : अखेर पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला

याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, जम्मू-काश्मीरवरून तुर्कस्तानच्या अध्यक्षांकडून देण्यात आलेले सर्व संदर्भ भारत फेटाळतो आहे. कारण, जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. जो कधीच वेगळा होऊ शकत नाही. एर्दोगान यांनी शुक्रवारी बोलताना काश्मिरींच्या संघर्षाची तुलना पहिल्या महायुद्धादरम्यान विदेशी शासकांविरोधातील तुर्कस्तानने लढलेल्या लढाईशी केली होती.

- इंडियन उसेन बोल्टला लॉटरी; ट्रेनिंगची तयारी सुरू!

यावर रवीश कुमार म्हणाले की, एर्दोगान यांची काश्मीरसंदर्भातील सर्व विधाने आम्ही फेटाळून लावतो आहोत. आम्ही तुर्कस्तानच्या नेतृत्वाला विनंती करतो की, त्यांनी भारताच्या अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करू नये. सत्य काय आहे, ते नीट समजून घ्यावे व पाकिस्तानातून निर्माण होणाऱ्या दहशतवादामुळे भारत व प्रदेशाला धोका आहे. 

- भिंत कोसळली म्हणून केलं तब्बल 400 दलितांनी धर्मांतर