Heatwave: उष्णतेची बातमी सांगताना दूरदर्शन अँकर बेशुद्ध! स्टुडिओत गोंधळ, नेमकं काय घडलं?

Heatwave: काही ठिकाणी 20 दिवसांपेक्षा जास्त उष्णतेची लाट नोंदवली जाऊ शकते. तीव्र उष्णतेमुळे पॉवर ग्रीड्सवर ताण येऊ शकतो आणि परिणामी भारताच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
Doordarshan anchor unconscious while reporting heat Chaos
Doordarshan anchor unconscious while reporting heat Chaosesakal

भारताच्या काही भागात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. शनिवारी अनेक भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत होते. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, दिवसभरात छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. दरम्यान कोलकातामध्ये दूरदर्शनच्या शाखेतील अँकर उष्म लहरींचे अपडेट्स लाइव्ह ऑन एअर वाचत असताना अचानक बेशुद्ध झाल्या.  

लोपामुद्रा सिन्हा असे दूरदर्शनच्या अँकरचे नाव असून, त्या दूरदर्शनवर लाईव्ह टीव्हीवर उष्माघाताशी संबंधित बातम्या वाचत होत्या आणि त्या बेशुद्ध झाल्या. नंतर त्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. लोपामुद्रा दूरदर्शन पश्चिम बंगालच्या कोलकाता शाखेत काम करतात.

लोपामुद्रा सिन्हा यांनी फेसबुकवर त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की लाईव्ह न्यूज दरम्यान माझा रक्तदाब लक्षणीयरीत्या कमा झाला आणि मी बेशुद्ध झाले. मला खूप दिवसांपासून आजारी वाटत होते. वाटलं थोडं पाणी प्यायल्याने बरा होईल पण त्या वेळी तसं झालं नाही.

Doordarshan anchor unconscious while reporting heat Chaos
Loksabha election 2024 : बंगालमधील घराणेशाही! एक चतुर्थांश जागांवर राजकीय घराण्यांमधील लोकांना संधी

लोपामुद्रा सिन्हा म्हणाल्या, मी कधीही बातम्या वाचायला पाणी घेऊन बसत नाही, मग ती 10 मिनिटांची असो किंवा अर्ध्या तासाची बातमी. मी फ्लोअर मॅनेजरकडे बोट दाखवून पाण्याची बाटली मागितली, पण जेव्हा मी बेशुद्ध पडले तेव्हा मी पाणी पिऊ शकले नाही कारन ऑन एअर होते.

शनिवारी काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा सात ते आठ अंशांनी अधिक नोंदवले गेले. मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, बिहार आणि झारखंड या भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस अधिक राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी 20 दिवसांपेक्षा जास्त उष्णतेची लाट नोंदवली जाऊ शकते. तीव्र उष्णतेमुळे पॉवर ग्रीड्सवर ताण येऊ शकतो आणि परिणामी भारताच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.

Doordarshan anchor unconscious while reporting heat Chaos
Mumbai BJP Office Fire: मुंबईतील भाजप कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com