Loksabha election 2024 : बंगालमधील घराणेशाही! एक चतुर्थांश जागांवर राजकीय घराण्यांमधील लोकांना संधी

Mamata Banerjee News
Mamata Banerjee Newsesakal

कोलकता : पश्‍चिम बंगाल हे कार्यकर्त्यांचे, विद्यार्थ्यांच्या राजकारणाचे राज्य आहे. निवडणूक आली की येथील कार्यकर्ता, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, प्रचंड सक्रिय होतो. भिंती रंगवणे, पत्रके वाटणे अशा गोष्टींना वेग येतो. साहजिकच, सर्वच पक्षांचा आपल्या कार्यकर्त्यांवर जीव असतो आणि या कार्यकर्त्यांनाच पुढे जाण्याची संधी दिली जाते. यंदा मात्र चित्र वेगळे दिसत आहे. घराणेशाहीच्या राजकारणापासून आतापर्यंत दूर असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये एक चतुर्थांश जागांवर राजकीय घराण्यांमधीलच लोकांना संधी देण्यात आली आहे.

Mamata Banerjee News
KKR vs RCB सामन्यात राडा! विकेट जाताच विराट अंपायरवर भडकला, नक्की झालं काय?

एकूण मतदारसंघ : ४२

नेत्यांच्या घरात दिली गेलेली तिकीटे : १३

पक्षनिहाय उमेदवारी वाटप

तृणमूल काँग्रेस : ५

- डायमंड हार्बर : अभिषेक बॅनर्जी (मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे)

- उलुबेरीया : सजदा अहमद (माजी खासदार सुलतान अहमद यांच्या पत्नी)

- जयनगर : प्रतिमा मंडल (माजी खासदार गोविंदचंद्र नास्कर यांची कन्या)

- वर्धमान -दुर्गपूर : किर्ती आझाद (बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र)

- दक्षिण कोलकता : माला राय (माजी आमदार निर्वेद राय यांच्या पत्नी)

काँग्रेस : ४

- दक्षिण मालदा : एशा खान चौधरी (खासदार अबु हसिम खान चौधरी यांचे पुत्र)

- पुरुलिया : नेपाल महातो (माजी खासदार देवेंद्र महारो यांचे पुत्र)

- जांगीपूर : मुर्तजा हुसेन (माजी मंत्री अब्दुस सत्तार यांचे नातू)

- राजगंज : अली इम्रान राम्झ (माजी मंत्री हाफिज अलम सैरानी यांचे पुतणे)

भाजप : २

- कंथी : सौमेंदू अधिकारी (माजी खासदार शिशिर अधिकारी यांचे पुत्र)

- बोगाव : शंतनु ठाकूर (वडील मंजुल ठाकूर आणि आत्या ममताबाला ठाकूर दोघेही माजी मंत्री)

माकप : २

- दक्षिण कोलकता : सरिया शाह हलिम (विधानसभेचे माजी अध्यक्ष हशिम अब्दुल हलिम यांच्या स्नुषा)

- सेरमपूर : दीपसीता धर (माजी आमदार पद्मानिधी धर यांची नात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com