Dr. Dharmveer Gandhi
Dr. Dharmveer Gandhiesakal

Dr. Dharmveer Gandhi : आपचे माजी खासदार गांधी काँग्रेसमध्ये

सध्या पतियाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार असलेल्या परनीत कौर भाजपत गेल्या आहेत

नवी दिल्ली : आपचे माजी खासदार डॉ. धर्मवीर गांधी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. सध्या देशात असलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी काँग्रेसशिवाय दुसरा सक्षम पक्ष नसल्याने कोणतीही आशा वा महत्वाकांक्षा न ठेवता आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे डॉ. गांधी यांनी सांगितले.

Dr. Dharmveer Gandhi
Baramati News : जागरुक बारामतीकरांकडून होतोय सीव्हिजील सिटीझन अँपचा प्रभावी वापर.....

पतियाळा येथील डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते असलेले डॉ. धर्मवीर गांधी २०१४ मध्ये पतियाळा मतदारसंघातून आपचे खासदार म्हणून निवडून आले होते. सध्या पतियाळा मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार असलेल्या परनीत कौर भाजपत गेल्या आहेत. यामुळे पतियाळा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉ. गांधी राहणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग, प्रवक्ता पवन खेडा, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रताप सिंग बाजवा आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com