विदेशी कंपन्यांनी भारतात लस तयार करावी; केंद्राची 'ऑफर'

paul
paul

नवी दिल्ली- देशात कोरोना (corona vaccine) लसींचा तुटवडा जाणवत आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. पण, या वयोगटातील व्यक्तींना लस मिळत नसल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार लस उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व मार्ग चोखाळून पाहात आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Dr VK Paul) म्हणाले की, बायोटेकनॉलोजी आणि इतर विभाग फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन कंपन्यांसोबत चर्चा करत आहोत. त्यांना लस पाठवण्यासाठी किंवा देशात उत्पादन करण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. (Dr VK Paul Member Health NITI Aayog corona vaccine availability)

आम्ही लस निर्मिती कंपन्यांशी चर्चा करुन या वर्षीच्या थर्ड क्वॉर्टरमध्ये लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहोत. लस निर्मिती कंपन्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांनी देशात यावं आणि याठिकाणी लस निर्मितीला सुरुवात करावी. जॉन्सन अँड जॉन्सनने चांगलं काम केलं असून आमची ऑफर स्वीकारली आहे, अशी माहिती पॉल यांनी दिली.

paul
तारीख ठरली! लवकरच भारतीयांना मिळणार Sputnik लस

एफडीए किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केलेल्या कोणत्याही लशीच्या वापराला भारतात परवानगी असेल. इम्पोर्ट लायसेन्स 1 ते 3 दिवसांत देण्यात येतील. कोणतेही लायसेन्स पेंडिग राहणार नाही, असंही पॉल म्हणाले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अधिकअधिक कंपन्या भारतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लशीचा तुटवडा कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

ऑगस्ट-डिसेंबरमध्ये भारतात 216 कोटी लशींचे उत्पादन होईल. त्यावेळी सर्व भारतीयांना लस मिळेल. स्पुटनिक लस भारतात दाखल झाली आहे. पुढील आढवड्यापासून ती सर्वांना उपलब्ध होईल याचा मला आनंद आहे. रशिया मुबलक लशी पाठवेल अशी आशा आहे, असंही पॉल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com