Presidential Election : द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होताच झाले पाच विक्रम; जाणून घ्या...

Draupadi Murmu Latest Marathi News
Draupadi Murmu Latest Marathi NewsDraupadi Murmu Latest Marathi News

नवी दिल्ली : १५ व्या राष्ट्रपतीपदाच्या (President) निवडणुकीत एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मोठा विजय मिळवला आहे. विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांनी पराभव मान्य करीत द्रौपदी मुर्मूचे अभिनंदन केले आहे. ‘आशा आहे की तुम्ही राज्यघटनेचे संरक्षक म्हणून कोणतीही भीती आणि पक्षपात न करता काम कराल’, असे सिन्हा म्हणाले. देशातील सर्वोच्च पदावर पोहोचणारी द्रौपदी मुर्मू या सर्वांत तरुण आदिवासी महिला ठरल्या आहे. या विजयासह त्यांनी इतिहास (Records) रचला आहे. (Draupadi Murmu Latest Marathi News)

देशातील पहिली आदिवासी राष्ट्रपती

विद्यमान राष्ट्रपती (President) रामनाथ कोविंद आणि के आर नारायणन यांच्या रूपाने देशाला दोन दलित राष्ट्रपती मिळाले आहेत. परंतु, द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या देशातील पहिल्या आदिवासी नेत्या आहे. ज्या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या आहेत. आजपर्यंत देशात एकही आदिवासी ना पंतप्रधान झाला ना गृहमंत्री. ओडिशात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू या २०१५ ते २०२१ पर्यंत झारखंडच्या राज्यपाल होत्या. विशेष म्हणजे झारखंडमध्ये कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल होत्या.

Draupadi Murmu Latest Marathi News
रेवडी वाटणं हा देवाचा प्रसाद; पण मित्रांचं कर्ज....; केजरीवालांचा मोदींवर पलटवार

सर्वांत तरुण अध्यक्ष

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. २५ जुलै रोजी त्यांचे वय ६४ वर्षे १ महिना आणि ८ दिवस असेल. द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या सर्वांत तरुण राष्ट्रपती ठरणार आहे. यापूर्वी हा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे वय ६४ वर्षे दोन महिने ६ दिवस होते. ते बिनविरोध अध्यक्ष झाले. त्याचवेळी केआर नारायणन यांचे नाव सर्वांत वयस्कर राष्ट्रपती बनलेल्यांमध्ये नोंदवले गेले आहे. वयाच्या ७७ वर्षे ५ महिने २१ दिवसांनी ते राष्ट्रपती झाले.

आझाद भारतात जन्मलेले राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला होता. २०१४ पर्यंत सर्व पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला होता. पंतप्रधान मोदी यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला. स्वतंत्र भारतात जन्मलेले ते पहिले पंतप्रधान आहे.

ओडिशाचे पहिले राष्ट्रपती

देशात आतापर्यंत झालेल्या १४ राष्ट्रपतींपैकी ७ दक्षिण भारतातील होते. त्याचवेळी डॉ. राजेंद्र प्रसाद असे राष्ट्रपती होते जे दोनदा राष्ट्रपती झाले आणि बिहारचे रहिवासी होते. या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या पहिल्या नेत्या आहे. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे. २००७ मध्ये प्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या.

Draupadi Murmu Latest Marathi News
राष्ट्रपतींना कोण-कोणत्या सुविधा मिळतात, अधिकार कोणते? जाणून घ्या

राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या नगरसेविका

द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या नेत्या आहे ज्या नगरसेवक राहिल्या आहे. द्रौपदी मुर्मू या शिक्षिका होत्या. त्यानंतर राजकारणात आल्या आणि १९९७ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या. तीन वर्षांनी त्या विधानसभेत पोहोचल्या. ओडिशाच्या भाजप-बीजेडी सरकारमध्ये त्या दोनदा मंत्री होत्या. एखाद्या राज्याच्या राज्यपाल बनणाऱ्या त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com