esakal | 2 DG औषधाची कमाल; 70 वर्षीय महिलेच्या ऑक्सिजन पातळीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Goel

2 DG औषधाची कमाल; 70 वर्षीय महिलेच्या ऑक्सिजन पातळीत वाढ

sakal_logo
By
अमित उजागरे

इंदौर : DRDO च्या कोरोनावरील बहुचर्चित 2-DG औषधानं कमाल केल्याची एक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका ७० वर्षीय आजीबाईंना हे औषध देण्यात आलं होतं. या औषधाचा काही वेळातच जबरदस्त प्रभाव दिसून आला. या आजीबाईंच्या ऑक्सिजन लेवलमध्ये (SPO2) केवळ एकाच तासांत ९२ वरुन ९४ पर्यंत वाढ झाली. तसेच त्यांना लिक्वीड ऑक्सिजन पुरवण्याची गरजही कमी भासू लागली. (DRDO 2 DG medicine fabulouse effect Oxygen Increased From 92 To 94 an hour)

हेही वाचा: Mucormycosis: डॉ. लहानेंचा दावा टॉप व्हायरॉलॉजिस्टनं काढला खोडून!

संतोष गोयल (वय ७०) असं या आजीबाईंचं नाव आहे. त्यांचा मुलगा पीयूष गोयल यांनी सांगितलं, "त्यांच्या आईला कोरोनाचा संसर्ग झाला होता. नंतर त्यांची प्रकृती ठीक झाली, त्यामुळे त्यांना घरी नेण्यात आलं. पण काही दिवसांनंतर अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यांना पोस्ट कोविडचा परिणाम जाणवू लागला. यामुळे गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्यावर पुन्हा खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले"

हेही वाचा: लशीकरण मोहीम खंडीत होऊ नये यासाठी डॉ. कांग यांनी सांगितला उपाय

आमच्या आईला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तसेच त्यांना आधी कर्करोगही झाला होता असं पीयूष गोयल यांनी सांगितलं. पण बऱ्याच काळापासून त्यांच्या ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होत नव्हती त्यामुळे त्यांनी DRDO कडे 2-DG या औषधाची मागणी केली. यानंतर DRDO नं हे औषध प्रायोगिक तत्वावर पुरवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर या आजीबाईंना रविवारी रात्री पहिला डोस तर सोमवारी दुसरी डोस देण्यात आला.

हेही वाचा: ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण नको, अन्यथा...; हाकेंचा इशारा

दुसऱ्या डोसनंतर संतोष गोयल यांच्यावर औषधाचा चांगला परिणाम दिसून आला. 2-DG औषधाचा डोस देण्यापूर्वी त्यांना त्यांचा ऑक्सिजन सॅच्युरेशन (SPO2) ९२ होता तो औषधाचा डोस दिल्यानंतर तासाभरातच ९४ झाला. तसेच लिक्विड ऑक्सिजन जो पूर्वी १४ लीटर द्वावा लागत होतो त्याऐवजी १० लीटरचीच गरज भासली.