ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रे भारतात पाठवण्यासाठी सीमेवर ड्रोन्सचा वापर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज भारतात पाठवण्यासाठी होत आहे. परंतु, आपल्याकडे असे ड्रोन शोधणे आणि ती निकामी करण्याची प्रणाली आहे. 

नवी दिल्ली- सीमेवर शस्त्रास्त्र आणि ड्रग्ज पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती एनएसजीचे महासंचालक एस एस देसवाल यांनी सांगितली आहे. ड्रोनचा यासाठी वापर केला जात असला तरी आपल्या सुरक्षा संस्थांकडे हा डाव हाणून पाडण्याची क्षमता असल्याचेही देसवाल यांनी सांगितले. 

देसवाल यांनी शुक्रवारी (दि.16) 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, पश्चिम सीमेवर ड्रोन असणे ही सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे. कारण त्याचा वापर आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्रे आणि ड्रग्ज भारतात पाठवण्यासाठी होत आहे. परंतु, आपल्याकडे असे ड्रोन शोधणे आणि ती निकामी करण्याची प्रणाली आहे. 

हेही वाचा- कोरोनाविरोधातील लढाईसाठी पुढील अडीच महिने महत्त्वाचे, आरोग्य मंत्र्यांचा इशारा

शुक्रवारी देशातील प्रमुख सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या एनएसजीचा 36 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. देशात दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली आहे. एनएसजी ही विशिष्ट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज आणि एक प्रशिक्षित संघटना आहे. त्यामुळेच असाधारण परिस्थितीत दहशतवादाच्या गंभीर कृत्यांना रोखण्यासाठी एनएसजी कायम सज्ज असते. 

देसवाल हे पूर्वी भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे महासंचालक होते. मागील महिन्यात त्यांना एनएसजीचा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. 

हेही वाचा- पैगंबरांचे व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवले; फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद

दरम्यान, भारताने रुस्तम-२ ड्रोनचे यशस्वी उड्डाण केले. याशिवाय इस्त्राईलकडून मिळालेल्या हेरान ड्रोन्सना मिसाइल आणि लेजर गाईडेड बॉम्बयुक्त करण्याची तयारी करण्यात येत आहे. र्नाटकच्या चित्रदुर्गामध्ये रुस्तमची चाचणी करण्यात आली. रुस्तम ड्रोन १६ हजार फुट उंचीवर सलग ८ तास उडत राहिला. या ड्रोनसोबत सिंथेटिक अपर्चर रडार, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम आणि सिचुएशनल अवेयरनेस सिस्टिम पाठवले जाऊ शकते. यामध्ये एक सॅटेलाईट कम्युनिकेशन लिंक सुद्धा आहे, जे युद्ध स्थितीची माहिती तत्काळ देते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drones used on the international border to send drugs and weapons says NSG