Draupadi Murmu: राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालासाठी या शेतकऱ्यांनी सुद्धा घेतलीय सुट्टी

जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर, त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील.
droupadi murmu village odisha uparbeda all set to celebrate her presidentia
droupadi murmu village odisha uparbeda all set to celebrate her presidentiaesakal

राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी म्हणजेच आज संसद भवनात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर, त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील. दरम्यान, मुर्मू यांच्या गावातील लोक आधीपासून आनंद साजरा करताना दिसत आहेत. गावकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.(droupadi murmu village odisha uparbeda all set to celebrate her presidentia)

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात झाला आहे. स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या मूळ गावी वीज पोहोचलेली नाही. आजही त्यांचे मूळ गाव विजेच्या सुविधेपासून दूर आहे.

droupadi murmu village odisha uparbeda all set to celebrate her presidentia
कोण आहेत भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?

मात्र, गावकऱ्यांनी मुर्मू यांच्या राष्ट्रपती निवडीच्या पार्श्वभूमिवर घरांमध्ये दिवे आणि फुलांची सजावट केली आहे. त आणि पारंपारिक लोकनृत्य मंडळे, विशेषत: संथाली नृत्य कलाकार, द्रौपदीची भारताची पुढील राष्ट्रपती म्हणून घोषणा होण्याच्या अपेक्षेने तयारी करत आहेत. ओडिशातून आणि आदिवासी समाजातून राष्ट्रपती होण्याची ही देशात पहिलीच वेळ आहे.

भात लावणीचा वेळ असला तरी संपुर्ण गावातील शेतकऱ्यांनी एक दिवस सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे स्थानिक शेतकरी सुकुलाल मुर्मू यांनी सांगितले.

उपरबेडा गावात कुक्कुटपालन व शेळीपालनासह शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गावात 6,000 लोक राहतात, त्यापैकी सुमारे 50 लोक राष्ट्रीय सुरक्षा दलात काम करतात.

droupadi murmu village odisha uparbeda all set to celebrate her presidentia
द्रोपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार करून भाजपला किती फायदा?

द्रौपदी यांचा भाचा तुलारामची पत्नी दुलारी तुडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मी किती आनंदी आहे हे मी सांगू शकत नाही. 'दीदी' झारखंडच्या राज्यपाल झाल्या तेव्हाही संपूर्ण गाव आनंदात होते. मात्र तिची अध्यक्षपदी निवड झाली तर ती आमच्यासाठी आनंदाहून अधिक काही असणार नाही. अशी भावना दुलारी यांनी व्यक्त केली. तुलाराम, दुलारी आणि त्यांची दोन मुले सध्या द्रौपदीच्या वडिलोपार्जित घरात राहतात.

कुसामुई ब्लॉक, ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 260 किमी अंतरावर आहे. डोंगराच्या पायथ्याशी वरबेरा गाव वसलेले आहे. गावात एक रस्ता आहे जो 15 किमी अंतरावर असलेल्या रायरंगपूरच्या जवळच्या वस्तीला जोडतो. जिथे द्रौपदी यांनी 1997 मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. रायरंगपूरमध्ये, व्यापारी समुदाय किमान 40,000 लोकांना वाटण्यासाठी मिठाई तयार करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com