मंत्र्याला कोरोना अन् मंत्रीमंडळ होम क्वारंटाइन...

वृत्तसंस्था
Monday, 1 June 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्यापही सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनंतर आता प्रशासकीय यंत्रणा आणि मंत्र्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे.

डेहराडून (उत्तराखंड) : जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्यापही सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनंतर आता प्रशासकीय यंत्रणा आणि मंत्र्यांपर्यंत कोरोना पोहोचला आहे.

...म्हणून नर्सने पाजलं नवजात बाळाला दूध

भारतीय जनता पक्षाचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सतपाल महाराज यांचा कोरोनाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. रविवारी (ता. 31) त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय, त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.

विमानाच्या ढिगाऱयाखाली सापडले कोट्यवधी रुपये...

दरम्यान, उत्तराखंडमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत येथे रुग्णांची संख्या 749 वर पोहोचली आहे. रविवारी, आणखी 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  या सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, उत्तराखंडमधील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister satpal maharaj covid 19 positive cm and cabinet home quarantine at uttarakhand