फोनवर बोलण्यास नकार दिल्याने गमवला जीव; ५ दिवस मृत्यूशी झूंज देत अखेर तिने सोडला श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12th class girl died today in jharkhand

फोनवर बोलण्यास नकार दिल्याने गमवला जीव; ५ दिवस मृत्यूशी झूंज देत अखेर तिने सोडला श्वास

पाच दिवस मृत्यूशी झूंज देत अखेर १२वी ची विद्यार्थिनी अंकिता हिचा अतिप्रमाणात जळाल्याने आज मृत्यू झालाय. फोनवर बोलण्यास नकार दिल्याने शाहरूख नावाच्या नराधमाने २३ ऑगस्ट रोजी अंकिताला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना झारखंड क्षेत्रातील असून तिच्या मृत्यूनंतर ठिकठिकाणी तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रदर्शन केल्या जातंय. (12th class girl died today in jharkhand)

पाच दिवसांपासून अंकिता मृत्यूशी झुंज देत होती. मात्र राचीच्या रिम्समध्ये आज सकाळी तिचा मृत्यू झाला. दुमका नगर क्षेत्रातील जरूवाडी भागात शाहरूख नावाच्या नराधमाने पहाटे अंकितावर पेट्रोल टाकून तिला जाळलं. ही घटना घडत असताना तिच्या घरात तिचे वडील, आजी आजोबा आणि लहान भाऊ होता. तिच्या किंचाळण्याचा आवाज येताच सगळे झोपेतून जागे झाले. आगीत जळत असलेल्या अंकिताच्या अंगावर बालट्यांनी पाणी ओतत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझेना. जेव्हापर्यंत आग शांत झाली तोवर अंकिता वाईटरित्या जळाली होती. तिला लगेच रूग्णालयात भर्ती करण्यात आले. मात्र अति जळाल्याने पाच दिवसांच्या उपचारानंतर आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

पोलीसांनी या प्रकरणाचा तपास घेत आरोपी शाहरूख विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. शाहरूख अंकिताचा नंबर मिळवत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. अखेर २३ ऑगस्टच्या पहाटे रागाधमात त्याने तिला जीवंत मारण्याचा बेत आखला आणि तिच्यावर पेट्रोल टाकत तिला जीवंत जाळलं. अंकिताच्या मृत्यूची बातमी येताच लोक आक्रोश करत रस्त्यावर उतरले आहेत. तिच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवण्यासाठी जागोजागी प्रदर्शन केलं जातंय. अंकिताच्या घरी सहानुभूती देण्यासाठी यावेळी प्रशासकीय अधिकारी पोहोचले.

हेही वाचा: आईनेच घेतला चिमुरड्याचा जीव; भावाचं पार्थिव काळजाशी घेत तो रस्त्यानं एकटाच निघाला

अंकिताच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता तिला न्याय मिळावा म्हणून बीजेपी आणि हिंदू संगठनांचं प्रदर्शन सुरू झालंय. शाहरूखचा पुतळाही काढत राग व्यक्त करण्यात आला. शाहरूखसह या प्रकरणात छोटू नावाच्या व्यक्तीचाही हात आहे. त्यामुळे 'जोपर्यंत त्याच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही प्रदर्शन करू', असं बीजेपी कार्यकर्ते यावेळी म्हणाले.

Web Title: Dumka Ankita 12th Class Died After 5 Days Treatment In Hospital Accused Shahrukh Jharkhand Protest As She Died Due To Fire

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..