
क्रूर आईने दोन वर्षीय चिमुरड्याला जीवे मारून त्याचा मृतदेह रस्त्यावर अमानुषपणे फेकून दिला. ही घटना उत्तर प्रदेशातील बागपत येथे घडली. निष्पाप चिमुरड्याला रस्त्यावर ढकलताच भरधाव येणाऱ्या गाडीने त्याला धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. (Step Mother killed her 2 year son)
चिमुरड्याची आई सावत्र असून या घटनेची पोलीसांना सूचना मिळताच पोलीसांनी या क्रूर महिलेला अटक करत तिच्यावर गुन्हा दाखल केला. आणि चिमुरड्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (Crime News) त्यानंतर चिमुरड्याचा मृतदेह त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आला. मात्र यावेळी रूग्णालयाने मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनही उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे मृतदेह हातात घेऊन भाऊ आणि वडील घराच्या दिशेने निघाले.
चिमुरड्याच्या बापलेकांकडे एवढेही पैसे नव्हते की ते खाजगी रूग्णवाहिका करू शकतील. अखेर एकमेकांकडे रस्त्याने पार्थिव सोपवत या दोघा बापलेकांनी चिमुरड्याचं पार्थिव घरापर्यंत नेलं. यादरम्यान या बापलेकांना कोणीही मदतीचा हात दिला नाही. निष्काळजी यंत्रणेपुढे हतबल झालेल्या या बापलेकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. डोळ्यात पाणी आणणाऱ्या त्यांच्या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील लोकांची गैरवागणुक आणि यंत्रणेचा निष्काळजीपणा स्पष्टच दिसून येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.