उड्डाणादरम्यान विमान एअर पॉकेटला धडकलं, तीन प्रवाशी गंभीर जखमी

एअर विस्ताराच्या विमानाचा विचित्र अपघात
Vistara-Airlines
Vistara-Airlines
Summary

हवेत निर्माण झालेल्या गोंधळानंतर विमानाचं सुखरुप लँडिंग

कोलकाता : उड्डाणादरम्यान विमान एअर पॉकेटला धडकल्यानं विमानातील तीन प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई-कोलकाता विस्तारा विमानात हा अपघात झाला आहे. लँडिंगपूर्वीच हा प्रकार घडल्याचं इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. (During flight plane hit air pocket three passengers seriously injured)

Vistara-Airlines
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला दिवाळीपर्यंत मुदतवाढ

फ्लाईट युके ७७५ या विस्ताराच्या विमानानं सोमवारी संध्याकाळी मुंबईहून कोलकाताच्या दिशेनं उड्डाण केलं. दरम्यान काही वेळानंतर हे विमान वातावरणात निर्माण झालेल्या एअर पॉकेटला (हवेची पोकळी) धडकलं. कोलकात्याच्या नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वीच हा प्रकार घडला. मात्र, एका मोठा अपघातून हे विमान बचावलं आणि सुरक्षितरित्या लँड झालं.

Vistara-Airlines
नाकातून देण्यात येणाऱ्या लसीवरही संशोधन सुरु - पंतप्रधान

सुत्राांच्या माहितीनुसार, विमानाच्या या विचित्र अपघातामध्ये तीन प्रवाशी गंभीरित्या जखमी झाले आहेत तर इतर पाच प्रवाशांना किरकोळ इजा झाली. लँडिंगदरम्यान जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. तसेच तीन गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना लँडिंगनंतर तातडीनं शहरातील चारनॉक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यामध्ये एका प्रवाशाचा खांदा निखळला, एका महिलेच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं तर तिसरा गंभीर जखमी एक तरुण असून त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच जे किरकोळ जखमी झाले होते त्यांना प्रथमोपचारानंतर त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्यात आलं. तर इतर सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

वीस हजार फूट उंचीवर घडला प्रकार

विमान हवेत कोलकात्यापासून ७० नॉटिकल माइल अंतरावर असताना हा अपघात घडला. विमान १७,००० ते २०,००० फूट उंचावर एअर व्हॅक्युम पॉकेटमध्ये पडल्यानं विमानानं काही काळ आपलं नियंत्रण गमावलं होतं. त्यामुळे विमानातील प्रवाशांनीही नियंत्रण गमावल्यानं त्यांना दुखापत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com