

Ethanol-Blended Petrol: India Expands Green Fuel Options with E20 to E30 Rollout
esakal
केंद्र सरकार पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल मिश्रित इंधनाला सातत्याने प्रोत्साहन देत आहे. याच धोरणांतर्गत ई२२, ई२५, ई२७ आणि ई३० सारख्या उच्च इथेनॉल मिश्रणांवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २२ टक्के ते ३० टक्के इथेनॉल असलेल्या पेट्रोलची किंमत ग्राहकांसाठी आकर्षक होईल आणि त्यांना या इंधनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.