Summer : पूर्व भारतावर सूर्य आग ओकणार; हवामान खात्याचा इशारा

पूर्व भारतावर पुढील पाच दिवस सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून (आयएमडी) देण्यात आला आहे.
Temperature
Temperatureesakal

नवी दिल्ली - पूर्व भारतावर पुढील पाच दिवस सूर्य अक्षरशः आग ओकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून (आयएमडी) देण्यात आला आहे. याआधी विविध भागांना दोन लाटांचा तडाखा बसला असून पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहार या राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे.

ओडिशामध्ये १५ एप्रिलपासून उष्णतेच्या लाटेची तीव्रता पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये १७ एप्रिलपासून या लाटेची तीव्रता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आता पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू, उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक असेल.

आंध्रप्रदेश, तमिळनाडू, पुद्दुच्चेरी, कर्नाटक, गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये आर्द्रतेमुळे उष्णतेचा प्रकोप जाणवू शकतो असे सांगण्यात आले. पूर्व मध्यप्रदेशात पुढील दोन दिवस रात्रीचे तापमान अधिक राहू शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. ग्रामीण भागांपेक्षा शहरांमध्ये तापमानाचा पारा अधिक असू शकतो.

दरम्यान उष्णतेच्या या लाटेचा मोठा फटका निवडणूक प्रक्रियेलाही बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानेही स्थानिक यंत्रणेला आवश्यक त्या उपाययोजना आखण्याच्या सूचना केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com