Elections 2022 : कोरोना संसर्गात घट; ECनं हटवले स्टार प्रचारकांवरील निर्बंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Assembly Elections of Five States 2022
Elections 2022 : कोरोना संसर्गात घट; ECकडून स्टार प्रचारकांवरील निर्बंध शिथिल

कोरोना संसर्गात घट; ECनं हटवले स्टार प्रचारकांवरील निर्बंध

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाच्या संसर्गात घट होत असल्यानं निवडणूक आयोगानं (Election Commission) स्टार प्रचारकांच्या (Star Campaigners) मर्यादेत वाढ केली आहे. सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Elections) सुरु असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचारावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. शिथिलतेचा निर्णय तात्काळ प्रभावानं लागू होणार आहे. (EC restores maximum limit for star campaigners with immediate effect)

नव्या गाईडलाईन्सनुसार, निवडणूक आयोगानं स्टार प्रचाराकांची मर्यादा पूर्ववत केली असून राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसाठी स्टार प्रचारकांची मर्यादा ४० इतकी असणार आहे. तर इतर लहान नोंदणीकृत पक्षांसाठी स्टार प्रचारकांची मर्यादा २० असणार आहे. दरम्यान, २३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सध्याच्या यादीमध्ये अतिरिक्त स्टार प्रचारकांच्या नावांचा समावेश करत ही नावं पाठवण्याचं आवाहन निवडणूक आयोगाकडून निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.

हेही वाचा: दहशतवाद्यांनी 'सपाची सायकल'च का वापरली? PMमोदींचं अजब विधान चर्चेत

दरम्यान, निवडणूक आयोगानं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकांवर ऑक्टोबर २०२० मध्ये निर्बंध घातले होते. यामध्ये ४० ऐवजी ३० प्रचारकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरु होता आणि कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ होत होती. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानं विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्टार प्रचारकांवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी करण्यात आली होती.

Web Title: Ec Restores Maximum Limit For Star Campaigners With Immediate Effect

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top