अच्छे दिन की 'दीन'? अर्थव्यवस्थेत गेल्या 40 वर्षांतील सर्वात मोठी घसरण; उत्पादन क्षेत्र रसातळाला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

कोरोना प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जायच्या आधीच अर्थव्यवस्था उतरतीला लागली होती.

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्था रसातळाला जायच्या आधीच अर्थव्यवस्था उतरतीला लागली होती. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंची निर्मिती वाढवण्यासाठी सरकारने 'मेक इन इंडिया'सारखी योजना सुरु केली होती. मात्र, तरीही तिचा फार फायदा झालेला दिसून आला नाही. याउलट, 2019 मध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये मोठी घट झाल्याचेच दिसून आले. 2019 मध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्राने जीडीपीच्या 27.5 टक्के योगदान दिलं आहे. गेल्या 20 वर्षांमधील ही सर्वांत वाईट अशी कामगिरी गणली जाते. यापूर्वीच्या उत्पादन क्षेत्रातील कामगिरीवर एक नजर टाकल्यास ही बाब स्पष्ट होते. 2016 साळी 29.3 तर 2014 मध्ये सरासरी 30 टक्क्यांचा उल्लेख करता येईल, असं बिझनेस स्टॅण्डर्ड्सने दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटलं आहे. 

हेही वाचा - हे बरंय! पठ्ठ्याने सात वर्षांपूर्वी दुकानाचं नाव ठेवलं 'कोरोना'; आता होतोय फायदा

तब्बल अडीच टक्क्यांनी मागील पाच वर्षांतील उत्पादन क्षेत्राची जीडीपीची आकडेवारी घसरली आहे. आशियामधील सर्वांत कमी औद्योगिकरण असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. ही सारी आकडेवारी ही कोरोनापूर्व काळातील आहे. यावर्षी कोरोनाचा जबरदस्त फटका  बसल्याने अर्थव्यवस्थेचे चाक अधिकच घट्टपणे रुतून बसले आहे. 2020 च्या पहिल्या सहामाहीमध्येच औद्योगिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मेक इन इंडियाच्या मोहिमेचाही काही फायदा न झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 2020 च्या आर्थिक वर्षांत पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये तब्बल 23.9 झाली आहे. याआधी 2019-20 वर्षात अर्थव्यवस्थेत 4.2 टक्क्यांची घसरण दिसून आली  होती. मागील दिड वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्थेची ही पडझड चिंताजनक मानली जात आहे. 

हेही वाचा - घ्या! मुतखड्याच्या ऑपरेशनवेळी डॉक्टरने काढली किडनी; म्हणाले, सो सॉरी! चूक झाली
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 10.3 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे, जी अभूतपूर्व आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: economy unprecedentedly in worst condition gdp hit 20 year low in 2019