3,300 कोटींच्या फसवणूक प्रकरणी PISLच्या एमडीला ईडीकडून अटक

Vuppalapati Satrsh kumar PISLMD
Vuppalapati Satrsh kumar PISLMDGoogle

हैद्राबाद : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) हैद्राबामधील कंपनी पृथ्वी इन्फॉर्मेशन सोल्युशन्स लिमिटेड (PISL) चे व्यवस्थापकीय संचालक वुप्पलपती सतीश कुमार यांना मनी लाँड्रिंग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 3,316 कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अटक केली आहे. ईडीने यापूर्वी याच प्रकरणात व्हीएमसी सिस्टीम्स लिमिटेडच्या एमडी हिमा बिंदू बी (Hima Bindu B) यांना अटक केली होती .

ईडीने सीबीआयने व्हीएमसी सिस्टीम्स लिमिटेड (VMCL) च्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली होती , या कंपनीने बँकांच्या कन्सोर्टियमकडून कर्ज घेतले होते. या सर्व बँकांकडे सध्याची थकबाकी ही 3,316 कोटी रुपये इतकी आहे.

तसेच, फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले आहे की, VMCSL ने बनावट आणि डमी कंपन्यांच्या नावावर 692 कोटी रुपयांच्या ठेवी दाखवल्या, ज्या नंतर हस्तांतरित करण्यात आल्या. व्ही सतीश कुमार यांनी त्यांची कंपनी पीआयएसएल आणि एन्नर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातून आणि त्यांची बहीण व्हीएमसीएसएलच्या एमडी हिमा बिंदू बी यांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांनी चालवलेल्या कंपनीमध्ये फसवणुकीचे व्यवहार दाखवून बँकांना कोट्यावधी रुपयांना फसवले.

Vuppalapati Satrsh kumar PISLMD
फेसबुकची मोठी कारवाई, द्वेष पसरवणाऱ्या 3 कोटी पोस्ट हटवल्या

सतीश कुमार यांनी दावा केला की त्यांचा व्हीएमसीएसएलच्या एनपीएशी संबंध नाही, परंतु यावर्षी 20 जुलै रोजी केलेल्या तपासात, त्यांच्या घरातून व्हीएमसीएसएलच्या 40 हून अधिक हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या. डिजिटल डिव्हाइसच्या फॉरेन्सिक तपासणीत ते बेनामी व्यवहार आणि डमी कंपन्यांना फसवणूकीचे पैसे हस्तांतरित करण्यात सहभागी असल्याचे आढळले. त्यांना मनी लाँडरिंग अंतर्गत अटक करण्यात आली आणि न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने 10 दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे.

Vuppalapati Satrsh kumar PISLMD
बहिणीला गिफ्ट करा 'हे' 5G स्मार्टफोन, किंमतही आहे बजेटमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com