ED चा अधिकारी निघाला भाजपच्या गावा; देणार नोकरीचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED चा अधिकारी निघाला भाजपच्या गावा; देणार नोकरीचा राजीनामा

ED चा अधिकारी निघाला भाजपच्या गावा; देणार नोकरीचा राजीनामा

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून एक मोठी बातमी येत आहे. सक्तवसूली संचलनालयाचे जॉइंट डायरेक्टर राजेश्वर सिंह येत्या शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या अशा अचानक राजीनामा देण्यामागे राजकीय कारण असल्याचं म्हटलं जातंय. असं म्हटलं जातंय की, ते राजकारणात प्रवेश करणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते आमदारकी लढवणार असल्याचं म्हटलं जातंय. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं जातंय. एकीकडे भाजप ईडीचा वापर आपल्या विरोधकांविरोधात करतो, अशा स्वरुपाचा आरोप सातत्याना करण्यात येतो. ईडी म्हणजे भाजपच्या हातातील बाहुले बनले आहे, अशा स्वरुपाची तक्रार सातत्याने विरोधकांकडून करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्याचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय.

हेही वाचा: तालिबानच्या उदयावर पंतप्रधान मोदींचं अत्यंत सूचक विधान

राजेश्वर सिंह निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विधानसभा लढवू शकतात. सुल्तानपूरचे रहिवासी असणारे राजेश्वर सिंह हे यूपी केडरचे अधिकारी आहेत. २००९ साली त्यांची नियुक्ती इडीमध्ये झाली होती. आपल्या कार्यकाळाच्या दरम्यान त्यांनी २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, एअरसेल-मॅक्सिस डील, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड इत्यादी प्रकरणांमध्ये तपास केला होता.

हेही वाचा: कंदाहार अपहरण: कॅप्टननी सांगितला तेंव्हाच्या आणि आताच्या तालिबानमधील फरक

तसेच त्यांनी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराशी निगडीत तपास देखील केला आहे. तसेच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, मधु कोडा, जगन मोहन रेड्डी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा तपास देखील त्यांनी केला आहे.

Web Title: Ed Rajeshwar Singh Likely To Join Bjp Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..