
IAS अधिकाऱ्याच्या सहायकांकडून १९ कोटी रुपये जप्त, ईडीची मोठी कारवाई
रांची : ईडीने जवळपास १९ कोटी रुपये झारखंडचे आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या जवळच्या दोन सहायकांकडून जप्त केले आहे. भ्रष्टाचार आणि मनरेगा योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करत असताना ईडीने ही कारवाई केली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. संस्थेने एकूण १९.३१ कोटी रुपये आज शुक्रवारी (ता.सहा) जप्त केले. यातील १७ कोटी रुपये पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त करण्यात आले. तसेच १.८ कोटी रुपये हे दुसऱ्या ठिकाणावरुन जप्त केले. आयएएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानातून कागदपत्रेही जप्त करण्यात आले असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. (ED Seized 19 Crores From IAS Officers Aides In Jharkhand)
हेही वाचा: माझ्या मुलाचा खून होऊ शकतो, भाजप नेत्याच्या वडिलांची पोलिसांकडे तक्रार
शुक्रवारी ईडीने झारखंड आणि इतर चार राज्यांमध्ये भ्रष्टाचार आणि मनरेगातील गैरव्यवहारबाबत चौकशी मोहिम सुरु केली. झारखंडमधील कारवाईत २०००, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीच ईडीने राम बिनोदप्रसाद सिन्हा यांना अटक केली.
हेही वाचा: सिलेक्टिव्ह कारवाया नाहीत, वळसे पाटलांचा राणा दाम्पत्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया
त्यानंतर झारखंडच्या कुंतीचे विभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याला पकडण्यात आले. राम सिन्हा यांनी मनरेगाच्या २००७-०८ मधील निधीत १८ कोटींचा गैरव्यवहार केला. त्यानंतर ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिन्हा याच्या चौकशी दरम्यान मनरेगाच्या निधीतील गैरव्यवहारात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघडकीस आली. त्यापैकीच आयएएस पूजा सिंगल या एक होत.
Web Title: Ed Seized 19 Crores From Ias Officers Aides In Jharkhand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..