ED Raid Former DIG : माजी डीआयजीकडे ५३ कोटींची संपत्ती; मुंबई, कोलकाता, आसाममध्ये ईडीचे छापे, गरीब पाहुण्याच्या नावावर कोट्यावधींची रक्कम

ED Seizes Property : आसामच्या माजी डीआयजींविरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ईडीने ५३ कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त केली आहे. मुंबई, कोलकाता आणि आसाममधील विविध ठिकाणी छापे टाकून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली.
ED Raid Former DIG prasanna kumar datta

ED Raid Former DIG prasanna kumar datta

esakal

Updated on

Assam DIG Case : आसामचे माजी निवृत्त डीआयजी प्रसांता कुमार दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित सुमारे ५३.२८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने मोठी कारवाई केली. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याच्या आरोपांखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने ही चौकशी आसाम पोलिसांच्या विजिलन्स अँड अँटी करप्शन शाखेने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सुरू केली. या एफआयआरमध्ये प्रसांता कुमार दत्ता यांनी शासकीय सेवेत असताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा कितीतरी अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com