दिल्ली विधानसभेच्या तारखा आज होणार जाहीर 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जानेवारी 2020

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी दुपारी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याबाबत माहिती दिली. दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा करण्यात येईल.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज (सोमवारी) दुपारी साडेतीन वाजता जाहीर होणार आहेत. दिल्लीतील मतदान फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सकाळी दुपारी निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याबाबत माहिती दिली. दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारीत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडालेला दिसेल, अशी शक्यता आहे. 

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे जबरदस्त आव्हान असले तरी भाजप नेतृत्वाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याचे चित्र आहे. साहजिकच प्रचारासाठी नेत्यांना वेळ मिळावा यादृष्टीने 7 फेब्रुवारीपर्यंतच संसद अधिवेशन चालेल व नंतर ते पुन्हा मार्चमध्ये सुरू होईल, अशी शक्‍यता आहे. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानंतरच निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission of India to announce schedule of Delhi Elections today