esakal | दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान अन् 11 फेब्रुवारीला निकाल
sakal

बोलून बातमी शोधा

election commission

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा केली. फेब्रुवारीत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडणार आहे. 

दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान अन् 11 फेब्रुवारीला निकाल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज (सोमवारी) आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून, 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 11 निकाल लागणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा केली. फेब्रुवारीत दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडणार आहे. दिल्लीतील सुमारे एक कोटी 46 लाख मतदार 13, 750 पोलिस बूथद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. 90 हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेत मदत घेण्यात येणार आहे.  

JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे जबरदस्त आव्हान असले तरी भाजप नेतृत्वाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याचे चित्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभांना सुरवात केली आहे. काँग्रेसनेही आपले आव्हान निर्माण केले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 7 फेब्रुवारीपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर ते पुन्हा मार्चमध्ये सुरू होईल. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असून, याचाही निवडणुकीवर परिणाम होणार आहे.

loading image
go to top